Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

झटपट श्रीमंत होण्यासाठी 5 वेगळे विचार./ 5 different thoughts to get rich quick.

झटपट श्रीमंत होण्यासाठी 5 वेगळे विचार./ 5 different thoughts to get rich quick.



राम राम मंडळी,
      तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या लेखात. एक प्रसिद्ध रचना आहे, " दिसामाजी काहीतरी शिकत राहावे."  म्हणजे प्रत्येक दिवसाला काही ना काही तरी शिकत रहावे, परंतु आपल्या ब्लॉगच्या पोस्टमधून सर्वजण, खूप सारी माहिती प्राप्त करतच आहेत. तसेच शिकत आहेत. अशाच अनेक महत्त्वपूर्ण लेखांपैकी असणारा हा एक माहितीपूर्ण असा लेख.

झटपट श्रीमंत होण्यासाठी 5 वेगळे विचार.

झटपट श्रीमंत होण्यासाठी 5 वेगळे विचार.



        पैसा हे साध्य नाही तर ते एक साधन आहे आणि या पृथ्वीतलावर हे जीवन तरुण जाण्याचा तो एक अनिवार्य भाग आहे. त्यामुळे पैसा हा कमावलाच पाहिजे. मग प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट करून जसा हवा त्याप्रमाणे पैसा कमावत असतात.
       सर्वच लोक श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहत असतात, नव्हे तर त्यासाठी अमाप कष्टही करत असतात पण योग्य निर्णय आणि योग्य अंमलबजावणी यांचा कुठेतरी अभाव निर्माण झाल्याने प्रत्येकाच्या नशिबात त्या गोष्टी येत नाहीत.
         परंतु नशिबातील या गोष्टी ही बदलण्याची धमक फक्त "प्रामाणिक कष्टातच" असते आणि या प्रामाणिक कष्टाला स्मार्ट कामकाजाची व नियोजनाची जोड दिली तर नशिबात नसलेल्या गोष्टीही प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.

5 different thoughts to get rich quick.
5 different thoughts to get rich quick.

        या लेखात श्रीमंतीचा एक ते दोन ओळीचा राजमार्ग असेल, ही तुमची अपेक्षा नक्कीच चुकीचे ठरेल. प्रत्येकाला श्रीमंती मिळावी पण त्यासाठीच्या महत्त्वाच्या बाबींची पूर्तता, आवश्यक माहिती प्राप्तीसाठीची सहनशीलता आणि श्रीमंती बाबतची नम्रता असणे तेवढेच महत्त्वाचे असते.
    मित्रांनो, प्रत्येक जण हा पैसा मिळवण्यासाठी, विचारांप्रमाणेच कामेही करतो परंतु जर योग्य रोडमॅप असेल तर निश्चितच तुमचा श्रीमंत होण्याचा कालावधी किती तरी पटीने कमी होईल. असे कोणते वैशिष्ट्यपूर्ण विचार आहेत की ज्यामुळे झटपट योग्य मार्गाने चिरकाल टिकणारी श्रीमंती मिळू शकते, पाहूया या लेखात.....

झटपट श्रीमंत होण्यासाठी 5 वेगळे विचार./ 5 different thoughts to get rich quick.



* पहिली प्रायोरिटी - स्वतःचे आरोग्य (The first priority - one's own health)

The first priority - one's own health

The first priority - one's own health



       तुम्ही आहात म्हणून तुमच्या श्रीमंतीला किंमत आहे. श्रीमंत होण्यासाठी, बनण्यासाठी आणि ती श्रीमंती जगण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही निरोगी असणे ही पहिली तुमची प्रायोरिटी असणे गरजेचे आहे.
          श्रीमंत होण्यासाठी लागणारे स्किल्स, मेहनतीची तयारी, अलौकिक बुद्धिमत्ता यांना तेव्हाच किंमत किंवा महत्त्व असेल ज्या वेळेस तुमचे शरीर त्यासाठी बळकट आणि निरोगी असेल.
तुमच्या मिळकतीचा काही भाग हा तुमच्या शरीराच्या आरोग्यासाठी आवश्यकच असतो आणि तो तुम्ही नक्कीच बाजूला काढणे योग्य ठरू शकते.
    विविध प्रकारच्या आरोग्याच्या पॉलिसीज, इन्शुरन्स असतात त्या काढणे खूप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही केव्हा कोणत्या आजाराला बळी पडणार आहे हे तुम्हीही सांगू शकणार नाही त्यामुळे भविष्यातील आर्थिक फटका वाचण्यासाठी पॉलिसीज, इन्शुरन्स असणे खूपच फायदेशीर राहते.
        योग्य सकस आणि पौष्टिक आहार, पुरेशी व्यवस्थित झोप आणि मर्यादित सातत्यपूर्ण कालावधीचा व्यायाम या त्रिसूत्रीवर आधारित निरोगी शरीर बनत असते.
         निरोगी शरीर हे नव्या उमद्या विचारांना जन्म घालत असते आणि याच नाविन्यपूर्ण सृजनशील विचारांनीच श्रीमंतीचा रोडमॅप चालून जाणे सोयीचे बनते.
       मित्रांनो, जसे विचार तसे आचार आणि तुमच्या वाचनातूनच तुमची मनाची आणि शरीराची श्रीमंती दिसून येते आणि याचाच पुढचा टप्पा हा पैशाच्या श्रीमंतीचा असतो.


* पैश्याची बचत करायला शिका. (Learn to save money)

Learn to save money

Learn to save money



          प्रत्येकाला बचत करणे ही गोष्ट जमते असं काही नाही. पण ज्यांना ही गोष्ट, बाब समजली ते आज खूप श्रीमंत आहेत.
एवढे का महत्व द्यायचे बचतीला ?  तर बचत करणे हे कुणा फालतू आणि निष्काम माणसाचं काम नाही. बचतीसाठी लागतो सातत्य, संयम आणि सहनशीलता, ही त्रिसूत्री अंगी बाणवावी लागते.
         बचत का करावी ? किती रुपयांनी सुरुवात करावी ?  किती दिवस केली पाहिजे ? यांसारखे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते थोडक्यात पाहूयात.
          संकटे, अडचणी कधी सांगून येत नाहीत त्यामुळे तुमच्या कोणत्याही क्षणी तुम्हाला काही लाख रुपयांची गरज भासली तर तुमची बचतच अशा वेळेस कामाला येत असते.
         तुमची महिन्याची जेवढी आवक आहे त्याच्या 25 टक्के जरी बचत केली तरी खूप आहे. जर तुम्हाला महिन्याचे आठ हजार रुपये पगार असेल, वेतन असेल, हजरी मिळत असेल तर त्यातील दोन हजार रुपये तुम्ही बचत करणे गरजेचे आहे.
        बचतीचे अकाउंट हे शक्यतो वेगळेच अन् गुपित असणे खूप महत्त्वाचे असते, कारण त्यात जमा झालेली रक्कम, ही बचत तुमच्या मोठ्यात मोठ्या संकटासाठी तुम्हाला ती वापरावयाची असते. ज्यावेळेस तुमची प्रतिष्ठा पणाला लागलेली असेल.
       बचत ही तोपर्यंत करायची आहे, जोपर्यंत तुम्ही तुमच्या श्रीमंतीचा आकडा गाठत नाही तोपर्यंत त्याची सवयच लावून घ्यायची असते.
       समजा तुम्हाला जरी एकाच दिवसात काही लाखो रुपये मिळाले तर तुम्ही श्रीमंत जरूर व्हाल पण बचत नावाची सवय जर तुम्हाला नसेल तर त्या लाखाचे खाक व्हायला वेळ लागणार नाही, कारण बचत करत असताना काही कालावधीनंतर तुमच्यात आपसूकच बचतीसाठी चा संयम आणि सातत्यपूर्ण केलेली बचत आणि ते पैसे न काढण्यासाठी ठेवलेली सहनशीलता हे गुण तुमच्यात उत्पन्न झालेले असतील. त्यामुळे एका दिवसातील मिळालेले लाखो रुपये यापेक्षा टप्प्याटप्प्याने चिरकाल टिकणारे लाख रुपये कधीही फायद्याचे असते.


* सुरुवात करा - अनुभव घ्या.(Get started - take experience.)

Get started - take experience.

Get started - take experience.



श्रीमंत व्हायचं आहे हे बोलून नाही तर करून दाखवायचं असते. त्यासाठी कष्ट करणे अनिवार्य आहे.  मग नोकरी करा, व्यवसाय करा अथवा कोणतेही कामे करा. जेथून तुम्हाला तुमच्या उत्पन्नाचा मार्ग तयार होईल यासाठी काही विशेष बाबी....
       तुम्हाला श्रीमंती तेवढ्याच वेगाने मिळेल, जेवढ्या वेगाने तुम्ही सुरुवात कराल. तुमच्या कष्टानेच, कामाने तुमच्या कष्टाची गाडी श्रीमंतीच्या स्टेशन पर्यंत जाईल.
          तुम्ही दिवसाला किती कमावता, महिन्याला, वर्षाला, पाच वर्षात किती कमावतात याचा ठोकताळा तुम्हाला आला की, तुम्ही प्रत्येक ठिकाणी धडक देऊ लागता. आणि त्यातून मिळणारा अनुभव हा लाख मोलाचा असतो.
         घरात बसून कोणतेही काम न करता निव्वळ श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहणे किंवा त्याचा विचार करणे योग्य नाही. त्यासाठी तुम्हाला कामे करावी लागणार आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे. त्यामुळे तुम्ही काम कसे करनार, किती करनार याची स्वप्ने पाहण्यापेक्षा तुम्ही सुरुवात करणे हे खूप महत्त्वाचे आहे.
           एखाद्या प्रयत्नात तुम्हाला नाही जमलं तर दुसरं काम पाहण, तसेच ते क्षेत्र बदला. प्रत्येक गोष्ट किंवा ते काम तुमच्या स्किल्ससाठी असेलच असे नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची कामे, त्यांचा अनुभव घेणे तोपर्यंत महत्त्वाचे राहील जोपर्यंत तुमच्या मनाची रक्कम तुम्हाला मिळत नाही.
           तुम्हाला श्रीमंतीचा रोडमॅप जरी कोणी आखून दिला तरी तो दिसण्यासाठी अथवा अनुभवण्यासाठी तुमच्या कोणत्याही कामाला सुरुवात करणे तेवढेच महत्त्वाचे असते. कारण श्रीमंतीसाठी पैसा पाहिजे. पैशासाठी काम पाहिजे. अन् काम करण्यासाठी तुम्ही सुरुवात करणे गरजेचे आहे. त्यासोबतच अनुभव पाठीशी असणे ही उचित राहील.


* तुमचे ध्येय, पैश्याचा आकडा नेहमी नजरेसमोर ठेवा.(Always keep an eye on your goals and money.)

Always keep an eye on your goals and money.

Always keep an eye on your goals and money.



        एखाद्या गोष्टीतील वारंवार केलेले सातत्य, तुम्हाला त्या गोष्टीतील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवत असते. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे, असे तुम्ही ठरवले आहे तर मग त्या गोष्टीबद्दल वारंवार विचारांचे, तसेच कामातील सातत्य, कायम ठेवणे गरजेचे असते.
श्रीमंती ही पैशात मोजली जाते. सध्यातरी आपल्या लेखाचा उद्देश हा पैसा मिळवणे,श्रीमंत होणे हाच आहे. त्यासाठी तुम्हाला, तुमची श्रीमंती मिळविण्यासाठी ठराविक आकडा डोळ्यासमोर ठेवणे महत्त्वाचे राहील.
      जसे की एखाद्याला लाखो रुपये, काही वर्षांच्या कालावधीत मिळवायचे असेल तर त्याने त्या आपल्या मोबाईलवर, डायरीत अथवा झोपण्याच्या खोलीमध्ये जेथे आपली सदैव नजर जाते अशा ठिकाणी तो आकडा लिहून ठेवायचा आहे, ज्यामुळे वारंवार तुम्हाला तो आकडा दिसल्याने काम करण्यास प्रेरणा देईल.
        ज्या वेळेस तुम्हाला काही वेगळे करण्याची इच्छा होईल किंवा तुमचे मन तुमच्या कामात लागत नसेल त्यावेळेस तुमचा श्रीमंतीचा आखून दिलेला तुमचा आकडा, तुम्हाला त्या मनोरंजनाच्या गोष्टीपासून नेहमीच परावृत्त करत राहील.
       त्यामुळे तुम्ही ठरवलेलं तुमचं ध्येय पैशाच्या स्वरूपात जरी असेल तरी ते तुमच्या नजरेसमोर येत राहील अशा पद्धतीने लिहून ठेवणे गरजेचे आहे.
    सदैव नजरेत येणारे ध्येय, तुम्हाला वारंवार काम करण्यासाठी प्रेरित करत राहील. ज्यामुळे तुमची, तुमच्या कामाबद्दलची एकाग्रता टिकून राहण्यास मदत होईल.
लहानपणी आपण पाढे पाठांतर करताना जसे वारंवार घोकंपट्टी करायचं, अगदी त्याच पद्धतीची अंमलबजावणी तुम्हाला तुमच्या श्रीमंतीचा आकडा गाठण्यासाठी वापरावयाची आहे.


* स्वतःच्या नजरेत स्वतःची किंमत ही आदर्शवत ठेवा.(Keep your own value in your eyes.)


Keep your own value in your eyes.

Keep your own value in your eyes.


         आपण जे काही श्रीमंत होण्यासाठी धडपडतो आहे किंवा श्रीमंत झाल्यानंतर जी काही आपली वागणूक आहे, यावरून समाज आपल्याशी वागत असतो. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला तुम्ही ज्या प्रकारे महत्व देता त्या प्रकारे तुमच्या भोवतालचे वातावरण, मित्रपरिवार, नाते-गोते, सगेसोयरे तुम्हाला तसेच अनुभवत असतात.
      कोणतीही गोष्ट अंगी बानण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी पुरेसा असतो. त्यानंतर ती आपल्या आयुष्यातील एक सवय बनत जाते आणि तुमच्या सवयी ह्या तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतात.
      जसे तुम्ही स्वतःला समजतात तसेच तुम्ही बाहेरून समाजाला दिसत असतात. त्यामुळे स्वतःला समजण्यात कधीही कमीपणा घेऊ नका. आपण स्वतः एक वेगळे व्यक्तिमत्व आहोत. वेगळ्या ध्येयाने प्रेरित आहोत कि जे आजपर्यंत कोणीही प्राप्त केले नाही. अशा महत्त्वपूर्ण बाळगलेल्या पैकी तुम्ही एक वेगळे आहात.
     अशा पद्धतीचा सकारात्मक विचार तुमच्या मनात नेहमी रुजला गेल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळीच उंची प्राप्त होईल, ज्यामुळे समाज तुम्हाला एका वेगळ्याच नजरेतून पहावयास सुरुवात करेल. 
        पैसा, श्रीमंती कमाविण्यासाठी जो कालावधी लागतो त्याच कालावधीत तुमच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ही तुमच्या विचारांतूनच घडत असते. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार हे आदर्शवत स्वतः बद्दल नेहमीच प्रेरित आणि मोठ्या उंचीचे ठेवा.
जोपर्यंत तुम्ही स्वतःला एक श्रीमंत व्यक्ती म्हणून मानत नाहीत, तोपर्यंत तुमच्या आचरणात तुमच्या व्यक्तिमत्त्वातून ते तुम्ही प्रदर्शित करत नाहीत. त्यामुळे समाजही तुम्हाला त्या नजरेतून पाहत नाहीत. यासाठी सुरुवात तुमच्या विचारांनी करा, त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर आणि तुमच्या कामावर दिसून येईल. आणि त्यानंतरच समाज तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचा श्रीमंत म्हणून नक्कीच पाहतील.


मित्रांनो,

         आपल्या लेखाचा विषय जरी झटपट श्रीमंत होण्यासाठी 5 वेगळे विचार./ 5 different thoughts to get rich quick. असेल तरी यामध्ये दिलेले जे काही पाच विचार आहेत हे विचार आणि त्यांची अंमलबजावणी ही टप्प्याटप्प्याने आणि संयमाने अंगिकृत बनत असते. तुमच्या कोणत्याही कामासाठी आखलेल्या नियोजनाला जर तुमच्या प्रामाणिक शिस्तीची जोड मिळाली तर ही झटपट श्रीमंती तुम्हाला त्वरितच मिळून जाईल. यात शंका नाही. 
आता फक्त वेळ आहे हे विचार आचरणात आणण्याचे....... श्रीमंतीच्या आकड्या पर्यंतचे.


अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या माहिती ने तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण निर्माण झाले असतीलच, तसेच या प्रमाणे आवडलेली माहिती, इमेजेस, मेसेजेस आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.


तुमचे योगदान :-    

               मंडळी तुमच्या मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी माहिती असेल जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.

 

टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.


आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.    

आम्हाला linkdin वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.   




x

Post a Comment

0 Comments