Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

महत्वाच्या सात सवयी. नेहमी फायद्याच्याच. Seven important habits. To always advantage.

महत्वाच्या सात सवयी. नेहमी फायद्याच्याच. Seven important habits. To always advantage.

राम राम मंडळी,
टीम मराठीचा master तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो, एका आरोग्यपूर्ण माहितीच्या लेखामध्ये.
मित्रांनो, समाजात आपली एक वेगळी ओळख असावी. आपल्या शब्दाला ही किंमत असावी. इतरांप्रमाणे आपणही सर्वांना आवडू लागावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने चांगले वागण्याचा प्रयत्न करतो. निव्वळ वागण्याचाच नाही तर चांगले दिसण्यासाठी ही मेहनत घेत असतो. परंतू आपली ओळख आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कामामधून तयार होत असते. यासाठीचे कष्टही महत्त्वाचेच असतात.

महत्वाच्या सात सवयी. नेहमी फायद्याच्याच.
महत्वाच्या सात सवयी. नेहमी फायद्याच्याच.

चांगल्या सवयी एक चांगले कर्तुत्व, व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी नेहमीच उपयोगाचे असते. तुमच्या चांगल्या सवयीमुळे तुमच्या आयुष्याला योग्य आकार घडतो. त्यामुळे निश्चित ध्येय, दिशा ठरलेली असते. मित्रपरिवार, नातेवाईक, समाजातील व्यक्ती तुमच्याकडे एक आदर्शवत म्हणून पाहत असतात. परंतु हे आदर्शवत वाटणारे सुख सर्वांच्याच वाटेला येते, असे नाही.
या लेखामध्ये अशा काही सोप्या, साधारण जीवनातील सवयीबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामुळे प्रत्येकालाच आपली वेगळी ओळख बनवणे सोप्पे होईल.
चला तर मित्रानो, सुरुवात करूया आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या सवयीसाठीच्या माहितीला...

(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master  यांचेकडेच राहतील.)

Seven important habits. To always advantage.
Seven important habits. To always advantage.

* लवकर निजे लवकर उठे, साधारण वाटणारी पण महत्त्वाची सवय. (Get up early, is a normal but important habit.)

✓ आपले पूर्वीचे लोक आपणाला नेहमी सांगायचे की, "लवकर झोपा आणि लवकर उठा " अगदी साधे सोपे वाटणारे वाक्य पण खूप महत्त्वाचे आहे. 
✓ आजकाल आपण जेवढे यशस्वी माणसे पाहतो, त्यातील सर्वच व्यक्ती सकाळी लवकर उठतात म्हणजे सकाळी लवकर उठण्याच्या सवयीला खूप महत्त्व आहे, हे समजून घ्या.
अगदी साधारण वाटणारी ही सवय तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणते. सकाळी सकाळी लवकर उठल्याने तर आपला माईंड हा फ्रेश असतो, त्यामुळे सकाळच्या प्रसन्न वातावरणाने दिवसभराच्या पूर्ण कामांसाठीची मानसिकता ही सकारात्मक होते.
✓ तुमच्या जीवनातील कितीही मोठी समस्या अथवा अडचण यावर उपाय हा सकाळच्या शुभमुहूर्तावर मिळतोच मिळतो. याला वैज्ञानिक आणि अध्यात्मिकदृष्ट्या मान्यता आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने, नवतरुणाने ही सवय अंगी लावून घेतली पाहिजे.
✓ अनेकांना सुरुवातीच्या काळात सकाळी लवकर उठणे जमणार नाही. परंतु दररोज ज्या वेळेला उठता त्याच्या किमान दहा मिनिटे अगोदर उठायचे, असा जरी निश्चय केला तरी काही दिवसातच तुम्हालाही लवकर उठण्याची सवय आपोआप लागून जाते.
✓ तुमच्या सुदृढ शरीरासाठी, सकारात्मक मानसिकतेसाठी, दिवसभराच्या उत्साहदायी आरोग्यासाठी सकाळी लवकर उठणे फायद्याचे आहे.
✓ शिक्षण, नोकरी, व्यवसाय-धंदा यासारख्या कोणत्याही क्षेत्रातील ताणतणाव दूर करण्यासाठीचा सर्वोत्तम कालावधी हाच मानला जातो.

* परिस्थिती कोणतीही असो, सदैव प्रसन्न रहा. (Always be happy no matter what the situation.)

✓ जीवनात चढ-उतार, संकटे, सुख-दुख चालूच राहतात. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनामध्ये कायम राहणार आहेतच. त्यांच्याशी समरस होण्यातच शहाणपणा असतो.
✓ सदैव प्रसन्न राहिल्याने तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर तुम्हाला मिळतेच मिळते. तुमच्या प्रसन्न चेहऱ्याने तुम्ही भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये काही क्षण आनंदाचे तयार करू शकता. यामुळे तुमची प्रसन्नता ही एकप्रकारे सदैव सत्कारणीच लागत असते.
✓ एखादे भांडण, मारामारी, वाद-विवाद किंवा दुःखाचा प्रसंग असेल तर त्याबाबत जास्त विचारविनिमय किंवा ताणतणाव करून ती गोष्ट किंवा बाब काही कमी होणार नाही. परंतु सकारात्मक मानसिकतेने सदैव प्रसन्न चेहऱ्याने राहिले तर, कोणत्या गोष्टीला, किती महत्त्व द्यायचे, हे त्वरीत समजते.
✓ प्रत्येकाच्या जीवनात अडीअडचणी आहेतच मग सदैव तोंड पाडून बसून राहून, ती अडचण वाढवून घेण्यापेक्षा, प्रसन्न चेहऱ्याने, सकारात्मक मानसिकतेने तिच्याविषयी जास्त विचार न करता जीवनातील अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असा विचार करून नेहमी पुढे चालत राहण्याची मानसिकता ठेवा.

marathichamaster
marathichamaster

* दिवसातून एक तास स्वतःच्या आवडीसाठी द्या. (Give one hour a day to your liking)

✓ प्रत्येकाला कशाची ना कशाची आवड असतेच. जसे की, गायन, वाचन, लेखन, खेळणे, चित्रपट पाहणे इत्यादी. आणि त्यासाठी ते आवर्जून वेळ काढतातच. परंतु काही महाभाग तर संपूर्ण दिवस त्यातच घालवतात. त्यामुळे दिवसभरातील आवश्यक असणारी महत्त्वाची कामे करायची राहून जातात.
✓ आपली आवड आणि इतर महत्त्वाची कामे जसे की, शिक्षण, नोकरी, रोजगार, व्यवसाय आहेतच. दिवसभराचा ताणतणाव या कामांमधून येत असतो. त्यामुळे तो दूर करण्यासाठी मानसिकता ठीक असणे, गरजेचे असते. यासाठी स्वतःची आवड जोपासणे, हाच सर्वात सोपा मार्ग आहे.
✓ तुम्हाला जर गाणे ऐकायला आवडत असेल तर दिवसभरातील कोणताही एक तास गाणे ऐकण्यासाठी द्या. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटून ताणतणाव दूर झाल्यासारखे वाटेल. महत्त्वाच्या कामासाठी लागणारी एकाग्रता तुम्हाला त्वरीत प्राप्त होईल. तुमच्या प्रत्येक यशाच्या कामासाठी, कष्टासाठी मोकळ्या मनाची मानसिकता तुमच्या आवडीतुनच तयार होत असते.
✓ या सवयीमुळे तुमची आवड ही इतर महत्त्वाच्या कामाबरोबर जोपासली जाते.

* दिवसभराच्या कामाची सकाळीच लिस्ट बनवा. (Make a to-do list in the morning.)

✓ दिवसभरात तुम्हाला जेवढी कामे करायची असतात, त्यातील काही अनवधानाने लक्षात राहत नाहीत. त्यामुळे काही पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. यामुळे घरच्यांचा अथवा वरिष्ठांचा ओरडा खावा लागतो.
✓ दिवसभरात तुम्हाला जेवढी कामे करायचे आहेत, त्या सर्वांची एक टुडू लिस्ट बनवल्याने तुम्हाला त्या कामाचा अंदाज येतो. कोणती महत्त्वाची कामे आणि कोणती साधारण कामे, कोणकोणत्या वेळी करायची आहेत हे समजते.
✓ यामुळे तुमच्या दिवसाचे योग्य नियोजन सकाळीच तयार होत असल्याने वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते. दिवसभरात अनेक विविध कामे असतात, ही वेळेत पूर्ण करता येतातच त्यामुळे आपण इतरांच्या कौतुकास नेहमी पात्र होतोच, होतो.
✓ अशा छोट्या-छोट्या कामांचे नियोजन बनवत राहिल्याने भविष्यातील जीवनाबाबतचे, पैशाबाबतचे नियोजन बनवणे, सोपे वाटू लागते.
✓ अगदी सोपी वाटणारी ही सवय तुमच्या जीवनाला शिस्त लावण्याचे काम करत असते. लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्टीची किंमत असतेच, मग ती छोटी असो अथवा मोठी.
वाचनाची सवय.... सर्वोत्तम
वाचनाची सवय.... सर्वोत्तम

* आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून, अनुभव वाढवत रहा. (Keep expanding the experience from the happenings around you.)

✓ आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात मग ते छोट्या असो अथवा मोठ्या, वाईट असो अथवा चांगल्या, प्रत्येकामधून एक चांगला धडा, अनुभव शिकायला मिळत असतो.
✓ भले ती घटना आपल्याशी संबंधित असो अथवा नसो परंतु त्यातून मिळालेला बोध अथवा अनुभव हा खूप मोठा असतो. प्रत्येक वेळी स्वतः विशिष्ट गोष्टी करून त्यातून अनुभव मिळवणे हे सदैव शक्य नसते. त्यामुळे इतरांच्या अनुभवांतून नेहमी शिकत रहा.
✓ जीवनातील सर्वात मोठा गुरु हा अनुभव असतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, संकटात आणि अडचणीत सहकार्य करण्यासाठी कोणीच नसेल, त्यावेळेस हाच अनुभव अशा परिस्थितीतून तुम्हाला वर काढत असतो. 
✓ अनेक यशस्वी लोक, हे काही एकाच प्रयत्नात यशस्वी झालेली नसतात तर अनेक अपयश, अनुभवांच्या जोरावर त्यांनी यश गाठलेले असते. मग आपणही आपली अनुभवांची गाठोडी वाढवायला हवीत, यासाठी नेहमी सदैव शिकण्याची वृत्ती ठेवा.
✓ या सवयीमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात इतरांपेक्षा उल्लेखनीय बदल झालेला असेल.

* दररोज किमान दहा मिनिटे वाचन करा. (Read for at least ten minutes every day.)

✓ अनेकांना हसायला येईल, की एवढे सरळ, साधी, सोपी वाटणारी ही सवय तुमचं जीवन समृद्ध करून टाकणारी आहे , असे कोणी सांगितले तर आश्चर्य वाटायला नको.
वाचनाने माणूस समृद्ध होतो. एक पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते. तुमचे विचार तुमच्या वाचनातून प्रकट होत असतात. त्यामुळे आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता, तुमच्या मानसिकतेतून तयार होत असते.
✓ सकारात्मक मानसिकतेच्या वाढीसाठी वाचनासारखा पर्याय नाही. यासाठी दररोजच्या दहा मिनिटाच्या वाचनाच्या सवयीने, तुमच्या ज्ञानात सदैव काहीना काही भर पडत राहील.
✓ फक्त दहा मिनिटे वाचन ही अगदी सामान्य वाटणारी सवय, यामुळे तुम्हाला समाज, व्यवसाय, जीवन आणि पैसा या गोष्टी कशा वाचाव्यात हे शिकवून जाते.

* प्रत्येक चांगली गोष्ट, बाब लगेच लिहून ठेवा. (Every good thing, write down the matter right away.)

✓ एखादी गोष्ट अथवा बाब घडत असताना आपल्याला ती आवडते. परंतु भविष्यात त्याचे पुन्हा स्मरण करताना ती लक्षात न राहिल्याने, तिची खंत वाटू लागते.
✓ जसे की, तुम्ही एखादे पुस्तक वाचत आहात आणि त्यातील वाचलेले एखादे वाक्य तुम्हाला भावले किंवा आवडले तर भविष्यात पुन्हा ते वाक्य आठवण्यासाठी संपूर्ण पुस्तक पहावे लागेल. परंतु त्याच वेळेस तुमच्याजवळ असलेल्या डायरीमध्ये, ते वाक्य त्यात दिनांकाच्या नोंदीसह टिपून घेतले तर संपूर्ण पुस्तक वाचण्याची आवश्यकताच भासणार नाही.
✓ अगदी छोटीशी वाटणारी ही सवय, तुमच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबी संकलित करण्यासाठी महत्त्वाची ठरते. यामुळे तुम्ही कोणत्या वेळी, कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत, हे कळून येते.
✓ महत्वाची वाटणारी गोष्ट किंवा बाब लिहून ठेवल्याने, दुसऱ्या वेळेस आपल्या स्मरणात राहते, त्यामुळे अनुभवात वाढ होते. डायरीमध्ये केलेल्या चांगल्या गोष्टींचा संग्रह उत्तम व्यक्तिमत्त्वाचा कणखर पायाच असतो.
Marathichamaster - good habits
Marathichamaster - good habits

मित्रांनो,
जशा तुमच्या सवयी, तसेच तुमचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि सकारात्मक मानसिकता असते. समाज, मित्रपरिवार, नातेवाईक हे तुम्हाला, तुमच्या वागण्या-बोलण्यानुसार, तुम्हाला किंमत देत असतात. आपली ओळख आपल्या चांगल्या सवयींमधून वाढवायची असेल तर लेखातील दिलेल्या महत्त्वपूर्ण सवयी एकदा आजमावून बघा. नक्कीच सर्वांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलो न बदलो, परंतु स्वतःचा मात्र बदलेल.
तुमच्या सर्वांच्या सर्वोत्तम सवयीसाठी टीम मराठीचा मास्तरचा हा लेख सदैव मैत्रीपूर्ण भावनेतूनच असेल.
धन्यवाद...!!

अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

तुमचे योगदान :-    

                  मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
 
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.

आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.






Post a Comment

0 Comments