सक्सेसफुल व्यवसायाचा एकच नियम - फक्त विकायचे. The only rule of successful business - just sell.
राम राम मंडळी,
व्यवसायाने प्रेरित असलेल्या सर्व नवीन उद्योजक प्रेमी मित्रांसाठी हा नवीन लेख...
प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे, हे तर सर्वांनाच माहीत आहे. म्हणून यासाठी करावा लागतो तो म्हणजे व्यवसाय. व्यवसाय करून मोठे उद्योजक होता येते.
चांगल्या प्रकारचा बक्कळ पैसा जीवनात कमावता येतो, हे आपण समाजात पाहतच आहोत. अशा सक्सेसफुल व्यावसायिकांच्या यादीत आपले ही नाव असावं. आपल्याला ही लोकांनी मानसन्मान, प्रतिष्ठा द्यावी, असे वाटत राहते.
निव्वळ स्वप्न पाहून कोणतीही गोष्ट साकारू शकत नाही. त्यासाठी कृती ही तेवढेच महत्त्वाची असते. माणूस अनुभवातून खूप काही शिकत असतो. परंतु अनुभवासाठी तुमचे सातत्याचे कष्ट असणेही तेवढेच महत्त्वाचे राहते.
मित्रांनो, या लेखांमध्ये अशा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला माहित होणार आहेत. ज्यामुळे एखादा व्यवसाय सातत्यपूर्ण कामगिरीने करता येऊ शकतो. इतरांनी केलेल्या अनेक चुका टाळून त्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने निरनिराळ्या बाबी अवलंबून व्यवसाय मोठा करता येतो.
![]() |
The only rule of successful business - just sell. |
अशा कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी, बाबी आहेत. ज्यामुळे आपला व्यवसाय इतरांपेक्षा लवकर सक्सेसफुल होऊ शकतो, ते पाहूया.
सक्सेसफुल व्यवसायाचा एकच नियम - फक्त विकायचे. The only rule of successful business - just sell.
* लोकांची गरज ओळखा आणि परिस्थितीनुरूप वागा.
* व्यवसाय साठीचे मार्केट शिकून घ्या.
* व्यवसायातला वेग आणि वेळ ओळखायला शिका.
* विकायला शिका - पैसा तुमचाच.
(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master यांचेकडेच राहतील.)
* लोकांची गरज ओळखा आणि परिस्थितीनुरूप वागा.(Identify people's needs and act accordingly.)
✓ व्यवसाय करताना आजूबाजूच्या वातावरणात काय हवं आहे, हे एकदा समजलं की, प्रत्येक गोष्ट त्याप्रमाणे बदलता येते.
✓ लोकांना काय पाहिजे, हे ओळखन तेवढच महत्त्वाच आहे. कारण तुमच्या व्यवसायाचा संबंध त्याच लोकांशी निगडित असल्याने, त्यांची मागणी पूर्ण करणे आपल्या व्यवसायाचे प्रथम कर्तव्य असते.
✓ लोकांच्या गरजेनुरूप लागणाऱ्या अनेक गोष्टी, वस्तू या लवकर समजल्या, तर इतर प्रतिस्पर्धी यांच्यापेक्षा आपण चांगली सेवा देऊन नावलौकिक मिळवू शकतो.
✓ तसेच आपल्या मालात, वस्तूमध्ये आपण मागणीप्रमाणे चांगली गुणवत्ता ही आणण्याचा प्रयत्न करू शकतो. हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे, ज्यामुळे प्रसिद्धी मिळण्यास वेळ लागत नाही.
✓ एकदा का, लोकांची गरज तुम्ही ओळखू शकला तर मार्केट गाजवायला वेळ लागत नाही. तुमचा व्यवसाय मार्केटमध्ये आपोआप सामावला जातो.
✓ प्रत्येक वेळेला किंमत असते. त्यामुळे व्यवसायात असताना समाजाची गरज ओळखणे. ही त्यावेळची परिस्थिती महत्त्वाचे असल्याने मोठा फायदा होण्याची चिन्हे जास्त असतात.
* व्यवसायासाठीचे मार्केट शिकून घ्या.(Learn the market for business.)
✓ व्यवसाय सक्सेसफुल करायचा असेल तर व्यवसाय ओळख खूप महत्त्वाची असते त्यामुळे लोकांना तुम्ही आणि तुमचा व्यवसाय समजू लागतो.
✓ आपण जो व्यवसाय करत आहे, त्याचे असणारे आवश्यक ज्ञान आपल्याला प्रत्यक्षात मार्केट मधूनच प्राप्त होत असते. त्यामुळे आपल्या व्यवसायात परिस्थितीनुरूप बदल करणे शक्य होते.
✓ एकदा का मार्केट शिकले तर व्यवसायात होणारे अनेक मोठे तोटे बर्यापैकी कमी होऊ शकतात आणि इतर प्रतिस्पर्ध्यांपेक्षा व्यवसाय अधिक वेगाने चालतो.
✓ व्यवसायासंबंधी असणार्या मार्केटमध्ये महत्त्वाच्या गोष्टींमध्ये व्यवसायासाठी मोक्याच्या ठिकाणी असणारी जागा, पुरेसे असणारे खेळते भांडवल, आणि आवश्यक तेवढे मुबलक मनुष्यबळ, योग्य प्रमाणात असल्याने कोणतीही वेळ चांगल्याप्रकारे निभावून नेता येते.
* व्यवसायातला वेग आणि वेळ ओळखायला शिका.(Learn to recognize speed and time in business.)
✓ व्यवसायामध्ये प्रत्येक वेळ ही महत्त्वाचे असते. छोटे मोठे निर्णय, विचार, व्यवसायाला वेगळ्या प्रकारची कलाटणी देऊ शकतात. त्यामुळे अशा प्रसंगी तुमच्या कामातील वेग आणि व्यवसायासाठी दिलेला वेळ माफक ठरतो.
✓ व्यवसाय ज्यावेळेस एका टप्प्यावर येऊन थांबतो अशा वेळेस मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झालेली असते. अशा वेळेला ती ओळखून अत्यंत चपळाईने वेगात व्यवसाय ग्राहकांपर्यंत नेता येतो.
✓ योग्य वेळी, योग्य निर्णय घेण्यासाठी एखादी संधी जरी चालून आली, तरी व्यवसायासाठी तुमचा वेग आणि वेळ तेवढाच मजबुत असावयास हवा, ज्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभ होऊ शकतो.
✓ तुमच्या व्यवसायाची ओळख ही तुम्ही असता. त्यामुळे मार्केटमध्ये असणाऱ्या छोट्या-मोठ्या बाबींवर लक्ष ठेवणे, तेवढेच गरजेचे राहते. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी पुरेसा वेळ आणि वेग असणे गरजेचे राहते.
* विकायला शिका - पैसा तुमचाच.(Learn to sell - the money is yours.)
✓ सक्सेसफुल व्यवसाय करण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विक्रीचे कौशल्य आत्मसात केल्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा उभारण्यास नक्की मदत होते.
✓ ज्याला विकायचं कळतं तो कोणतीही वस्तू, कोणत्याही ठिकाणी, आवश्यक वेळेत विकून पैसा तयार करतो आणि ते ही फक्त अनुभवाच्या बळावर. त्यामुळे हे तंत्र एकदा आपण व्यवस्थित लागू केले, की पैसा आपोआप चालून येतो.
✓ आपल्या व्यवसायाची छोटी-मोठी जाहिरात करून विकण्याचे तंत्र चांगल्या प्रकारे आत्मसात करता येऊ शकते. त्यासोबतच मोठा ग्राहकवर्ग मिळून जातो.
✓ अनेक छोट्या-मोठ्या ऑफर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करत असतात. त्यामुळे वेळोवेळी अशा अनेक छोट्या-मोठ्या ट्रिक्स, व्यवसाय वाढीस कामाला येतात.
✓ व्यवसायासाठी ग्राहक आवश्यक असतात. ग्राहक वाढीसाठी तुमची ओळख आणि संपर्क ही तेवढाच वाढवावा लागतो. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवता येते आणि हवा तसा पैसा उभा करता येतो.
✓ विकण्याचे तंत्र आत्मसात केल्याने मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागतो. यामुळे आलेल्या पैसा भविष्यातील मोठ्या भांडवलासाठी वापरू शकतो आणि भांडवल हा व्यवसायाचा आत्मा असल्याने व्यवसायातील कोणतीही वेळ आपण सहज लीलया पार करू शकतो.
मित्रांनो,
व्यवसाय करत असताना अनेक बाबी, गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि त्यावरचं व्यवसाय सक्सेसफुल होत असतो. या लेखामधील काही महत्त्वाच्या ठळक बाबी विशेषकरून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याद्वारे तुमचा व्यवसाय बर्यापैकी पैशाच्या स्टेशन पर्यंत नक्कीच धावू लागेल.
आम्हाला आशा आहे की लेखामध्ये दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण आपल्या व्यवसायात अंगीकारून नक्की सक्सेसफुल होऊ शकतो.
धन्यवाद.....!!
( आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल.नेहमी positive राहण्यासाठी फक्त चार टिप्स वापरा. (Just use four tips to stay positive.)
अभिप्राय :-
सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या माहिती ने तुमच्या नक्कीच काही प्रमाणात महत्त्वाची माहिती मिळाली असेलच. तसेच या प्रमाणे ही आवडलेली माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
तुमचे योगदान :-
मंडळी तुमच्या मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी माहिती असेल जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.
आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.







0 Comments
Thanks, for your comments.