पूर्वीच्या यशस्वी राजांचा माईंड-सेट असा असायचा. आजही मोजक्याच लोकांना माहित आहे. This was the mind-set of the successful kings of the past. Even today, few people know.
राम राम मंडळी,
टीम मराठीचा मास्तर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो एका विशेष लेखामध्ये....
आपण समाजात पाहतोच की, अनेक लोक कमी कालावधीत खूप मोठे यश संपादन करतात. खूप सारा पैसा मिळवतात आणि आपण विचारच करत बसलेलो असतो. जर ती व्यक्ती पैसा मिळू शकते तर आपण कुठे कमी पडतोय ? याचा विचार करणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे.
आताचे जे काही यशस्वी सक्सेसफुल व्यक्ती समाजात दिसतात. त्यांना असे काही माहिती आहे, की ज्याच्या जोरावर ते एका वेगळ्या उंचीपर्यंत पोहोचू शकले आहेत. अशी काही माहिती, जी इतर सर्वसामान्य लोकांना कधी ऐकण्यात ही आलेली नसते.
पूर्वी इतिहासकाळात राजेशाही अंमल असायचा अशा वेळेस अनेक छोटी-मोठी राज्य आणि त्यांचा राजा, तसेच त्यावेळची परिस्थिती यांबाबत आपणाला नक्कीच ऐकायला आवडते. परंतु त्यातील असे काही मोजकेच छोटे राजे होते, ज्यांनी आपले राज्य यशस्वीपणे सांभाळल्याचे, टिकवल्याचे आपण इतिहासात वाचतो. अशा यशस्वी राजांचा mindset काही वेगळाच असायचा. ज्याच्या बळावर कितीही छोटे असणारे राज्य समर्थपणे बलाढ्य राजसत्तांना तोंड देत असे.
अशाच पूर्वीच्या यशस्वी राज्यांच्या महत्त्वाच्या गोष्टी, mindset आजही काही यशस्वी माणसांना माहिती आहेत. आणि त्या वापरूनच ते यशस्वी जीवन जगत आहेत. त्या गोष्टी, महत्त्वाच्या बाबी या लेखात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या माहीतीच्या बळावर तुम्ही आपल्या जीवनात एक यशस्वी mindset असलेला व्यक्ती म्हणून लाभ घेऊ शकता.
चला तर मित्रांनो, वेळ न दवडता पूर्वीचे राजे यशस्वी होण्यासाठी जी काही मानसिकता, विचार शैली अथवा जो काही mindset वापरत होते, त्यासाठीच्या माहितीला सुरुवात करुया.
* शेवटच्या श्वासापर्यंत स्वतःवरचा विश्वास किंचितही ढळू देत नव्हते. (Self-confidence did not waver until the last breath.)
इतिहास काळात आपण डोकावले असता, पूर्वीची अनेक छोटी-मोठी राजेशाही आपली राज्ये यशस्वीपणे टिकवण्याचे आपण पाहिले आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, राणा प्रताप , सम्राट अशोक, चोल सत्ता, सातवाहन, वाकाटक, चंद्रगुप्त मौर्य यांसारख्या अनेक शूर वीर, धाडसी, पराक्रमी राजांचा इतिहास दिसून येतो.
वरील सर्व महाराज त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्या राज्यांवर कितीही मोठी संकटे, आव्हाने, समस्या जरी उत्पन्न झाल्या तरी स्वतःवरचा विश्वास कायम ठेवत असे. आलेल्या संकटांना निकराने तोंड देत असत. त्यामुळे प्रजा, सैनिक यांनाही आपल्या राजाचा हेवा वाटत असे.
यशस्वी राजांच्या एका इशाऱ्याने आपल्या अल्प सैन्याच्या बळानेही, शत्रुपक्षाच्या अफाट शक्तीच्या सैन्यावर सुद्धा सहज विजय मिळवलेला दिसून येत असे.
अगदी याच प्रमाणे हे तंत्र आजच्या यशस्वी झालेल्या लोकांनी वापरलेले दिसून येते. व्यवसायात आलेला कितीही मोठा तोटा अथवा संकटे यांना न घाबरता स्वतःच्या विश्वासावर आणि मेहनतीच्या बळावर लयाला गेलेल उद्योगाचे साम्राज्य त्यांनी पुन्हा उभारलेले दिसून येते.
* कोणत्याही प्रसंगी शक्ती आणि युक्ती चा पुरेपूर वापर करत असे. (He used his power and tactics to the fullest in any occasion.)
इतिहासात डोकावले असता राजा आणि त्याचे पूर्ण राज्य कितीही छोटे असले तरी अनेक मोठ्या संकटांना त्यांनी आपल्या शक्तीच्या अथवा युक्तीच्या बळावर सहज परतवून लावलेले दिसून येते.
ज्यावेळेस पुरंदर किल्ल्याला सिद्धी जोहरने वेढा दिला होता. अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती काही चालेणा. त्यावेळेस त्यांनी युक्तीने तो प्रसंग निभावून नेल्याचे आपण वाचलेले आहे. शाहिस्तेखान, अफजलखान यांसारख्या मोठमोठ्या बलाढ्य क्रूर शत्रूंना कधी शक्तिने तर कधी युक्तीने नमवल्याचे आपण पाहिले आहे.
पूर्वीच्या काळी ज्याचे सैन्य अफाट ताकदीचे आणि संख्येने मोठे असेल त्या राजाला आपल्या राज्याचा प्रदेश सांभाळणे सोयीचे जात असे. परंतु छोटी असणारी अनेक राज्ये अशा मोठ्या शक्तींना लगेच बळी पडत असे. परंतु यातूनही स्वतःवर विश्वास असणारी अनेक छोटी-छोटी राज्ये आणि त्यांचा राजा, शक्तीच्या अथवा युक्तीच्या बळावर, आहे त्या प्रसंगाना यशस्वीपणे तोंड देत असे.
हीच ट्रिक्स वापरून आजच्या घडीला अनेक यशस्वी उद्योजक, व्यवसायिक लोक आपले नाव कमावत आहेत. अमाप पैसे मिळवत आहेत. आपण समाजात पाहतोच आहे की, शिक्षणात पारंगत नसलेल्या तरुणाने, व्यवसायात कमी कालावधीत खूप मोठं यश संपादन केलेले असते, ते फक्त त्याच्या युक्तीच्या आणि व्यवसायिक अनुभवाच्या बळावरच.
त्यामुळे जीवनात कोणत्याही वाईट प्रसंगांना सामोरे जात असताना ज्या ठिकाणी शक्ती उपयोगाला पडत नसेल, अशा वेळेस तुमची युक्ती कामाला येते. यापैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करावा लागला तरीही चांगलेच आहे. कारण त्या परिस्थितीला परतवून लावणे हा महत्त्वाचा उद्देश असतो.
* पूर्वीच्या काळी कोणतीही मोहीम करण्याअगोदर 90 टक्के आधीच पूर्वतयारी झालेली असायची, त्यानंतर प्रत्यक्षात दहा टक्केच काम बाकी असायचे.(In the past, 90 percent of the work was pre-prepared before any campaign, and only 10 percent of the work was actually left.)
![]() |
| पूर्वीच्या काळी कोणतीही मोहीम करण्याअगोदर 90 टक्के आधीच पूर्वतयारी झालेली असायची, त्यानंतर प्रत्यक्षात दहा टक्केच काम बाकी असायचे |
पूर्वीच्या काळी अनेक छोटीमोठी राज्य ज्यावेळेस अतुलनीय आणि अचंबित करणारी अशी कामगिरी करायचे, त्यावेळेस त्या यशस्वी लढायांची, मोहिमांची पूर्वतयारी त्यांची ही सर्वोत्तमच असायची.
एखाद्या गोष्टीचा वारंवार केलेला अभ्यास अथवा सराव हा तुम्हाला, त्या गोष्टीत सर्वोच्च शिखरापर्यंतचे असणारे यश प्रदान करतो. याच बळावर कोणतीही मोहीम आखताना पूर्वीचे यशस्वी राजे त्याचा पूर्व अभ्यास, तयारी ही आधीच करून ठेवायचे. यामुळे प्रत्यक्षात रणभूमीवर फक्त दहा टक्केच त्याची अंमलबजावणी करायला लागत असल्याने ते युद्ध अथवा मोहीम यशस्वीरित्या जिंकायचे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करताना, आलेल्या अनेक मोठमोठ्या अडचणी, संकटे तसेच प्रतिस्पर्धी यांना अगदी कमी कालावधीत परतवून लावले. त्याचे कारणही तसेच होते, त्यांची केलेला अचूक अभ्यास पूर्व नियोजन आराखडा होय.
अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी, लढण्यासाठी चे साहित्य, हत्यारे, जागेची पाहणी, शत्रूपक्षाच्या असलेल्या कमकुवत बाजू यांसारख्या छोट्या-मोठ्या गोष्टींची माहिती मिळवत असे. आणि मग पूर्व अभ्यासाची तयारी करूनच कोणत्याही वेळी, कोणत्याही टप्प्यावर कसे लढायचे ? याबाबत पूर्व नियोजनामुळेच प्रत्यक्षात युद्ध भूमीवर निर्णय घेतले जायचे.
याच पद्धतीचा वापर करून आज यशस्वी झालेल्या अनेक उद्योजकांनी अथवा लोकांनी आपल्या क्षेत्रात यश संपादन केलेले दिसून येते.
आज आपण अनेक मराठी माणसे यशस्वी झालेले पाहतो. त्यामागे त्यांची असणारी त्या क्षेत्रातील अभ्यासू वृत्ती. आणि आलेल्या कोणत्याही संकटांना समर्थपणे परतावून लावण्याची जिद्द, त्यांच्या पूर्व अभ्यासातूनच दिसून येत असते.
मित्रांनो,
पूर्वीचे राजे ज्या mindset च्या बळावर यशस्वीपणे आपली राज्ये सांभाळू शकली. त्यांच्या असणाऱ्या यशस्वी माईंड सेट संदर्भातील महत्त्वाची माहिती या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या आपण अंगीकारून आपल्या जीवनातील असणाऱ्या प्रत्येक समस्येला, संकटांना कशाप्रकारे हाताळायचे ? याबाबतचे मार्गदर्शन मिळते. तसेच किद्यामुंग्यासारखे न जगता, समाजात यशस्वीपणे कसे जगता येईल, हे दाखवून देता येते.
नक्कीच पूर्वीच्या राजांचा असलेल्या mindset बाबतच्या सार्या महत्त्वाच्या बाबी, तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी नक्कीच फायद्याच्या राहतील.
धन्यवाद.....!!
(आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल. समाज काय म्हणतोय, यापेक्षा तुमचा सकारात्मक विचार काय म्हणतोय - ते महत्त्वाचे.)
अभिप्राय :-
सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
तुमचे योगदान :-
मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.
आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.






0 Comments
Thanks, for your comments.