रिच डॅड पुअर डॅड पुस्तकातील पैशाबाबतच्या महत्त्वाच्या टिप्स. Important tips about money from the world famous Rich Dad Poor Dad book.
राम राम मंडळी,
आजच्या लेखाचा विषय सर्वांना समजला असेलच, जग प्रसिद्ध लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हणजेच, "रिच डॅड पुअर डॅड" यामध्ये श्रीमंत कसे व्हावे, पैसा कसा कमवावा, कसा गुंतवावा, याबाबतची स्वतःच्या अनुभवातील अनेक गोष्टी आणि माहिती सांगितलेली आहे.
अशा या जगप्रसिद्ध पुस्तकातून पैसा आणि पैशाचे महत्व यामुळे लेखकाच्या आयुष्यात कसे परिवर्तन घडत आले. यामुळे ते स्वतः कसे आर्थिक बाबतीत स्वावलंबी बनले, याबाबत माहिती दिलेली आहे. या माहितीतून काही महत्त्वाच्या अशा पैशाबाबतच्या टिप्स या लेखामध्ये पाहणार आहोत.
जीवनात प्रत्येकाला पैसा हवाच असतो. त्यासाठी सर्व जण आपापल्या परीने झटत असतात. पुस्तके वाचत असतात. नवनवीन ज्ञान घेत असतात. एकमेकांच्या पुढे जाण्याची स्पर्धा लागलेली असते. प्रत्येकाला वाटते मला खूप पैसा मिळावा. लहान मुलापासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांनाच पैसा म्हणजे जीव की प्राण वाटतो. या सर्वांच्या प्रत्येक विचाराचा सन्मान करून या लेखामध्ये दिलेल्या टिप्स, छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्या जीवनात आणल्या तर नक्कीच पैशाच्या बाबतीत तुम्ही ही समृद्ध झालेले असाल.
चला तर मित्रांनो पाहुयात, अशा कोणत्या महत्वाच्या पैशाबाबतच्या टिप्स रिच डॅड पूवर डॅड पुस्तकातील आहेत.
जगप्रसिद्ध रिच डॅड पुअर डॅड पुस्तकातील पैशाबाबतच्या महत्त्वाच्या टिप्स. Important tips about money from the world famous Rich Dad Poor Dad book.
* किती कमावता यापेक्षा किती बचत करता हे महत्त्वाचे.
* तुमच्याकडे आर्थिक कौशल्य हवीत, त्यामुळे विविध उत्पन्नाचे स्रोत तयार करता येतात.
* सामान्य लोक पैशासाठी कामे करतात तर श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात.
* प्रत्येकाकडे सर्वाधिक शक्तिशाली गुण असतो तो म्हणजे विचार
* वाढणारी आणि थांबणारी, गुंतवणूक यातील फरक वेळीच समजून घ्या.
(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master यांचेकडेच राहतील.)
* किती कमावता यापेक्षा किती बचत करता हे महत्त्वाचे. (How much you save is more important than how much you earn.)
![]() |
किती कमावता यापेक्षा किती बचत करता हे महत्त्वाचे. |
✓ रोबोट कियोसाकी आपल्या रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकात असे म्हणतात की, प्रत्येक जण हा पैसे कमावत आहे. परंतु कमवलेले पैसे यामधून तो किती बचत करतो. हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.
✓ कियोसकी त्यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य माणूस असो अथवा श्रीमंत माणूस पैसा कमावण्यासाठी प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात. परंतु मिळणारे पैसे तुम्ही कशा प्रकारे हाताळता हे खूप महत्त्वाचे ठरते.
✓ त्याला कारणही तसेच आहे जसे की तुमचे तारुण्य हे काही चिरकाल नसते, त्यालाही मर्यादित कालावधी असतो. अगदी त्याच प्रमाणे तुम्हाला मिळणारे उत्पन्न हे जोपर्यंत तुमच्याकडे असतात, तोपर्यन्त त्याला हजार वाटा मिळतात.
✓तुमचे उत्पन्न कितीही असू द्या, याला कियोसाकी यांच्या मताप्रमाणे काहीच किंमत नसते. कारण आलेले पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने जर जाणारच असेल तर त्या येणाऱ्या पैशाला किंमत राहत नाही.
✓ त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कमाईचा जास्तीत जास्त भाग हा बचत करायला हवा. कारण बचतीमुळे तुमचे अनेक प्रश्न सुटतात कारण तुम्ही पैशाची बचत करत असतात आणि तो प्रत्येक गोष्टीसाठी लागतोच.
✓ बचत केल्याने तुमच्यात एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास वाढू लागतो. पैसा नावाची गोष्ट तुम्हाला लवकर समजू लागते. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बचत करणे म्हणजे त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होईल.
* तुमच्याकडे आर्थिक कौशल्य हवीत, त्यामुळे विविध उत्पन्नाचे स्रोत तयार करता येतात.(You need financial skills, so you can create a variety of sources of income.)
![]() |
तुमच्याकडे आर्थिक कौशल्य हवीत, त्यामुळे विविध उत्पन्नाचे स्रोत तयार करता येतात |
✓ रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील याबाबतची दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे तुम्हाला मिळणारे आर्थिक स्रोत अनेक मार्गांनी असावयास हवा.
✓ पैसा कमवायचा असेल तर तो कसा कमवायचा, यासाठीचे अनेक अंगभूत कौशल्यगुण तुमच्याकडे असायलाच हवीत, त्यांच्या जोरावर तुम्ही अनेक मार्गांनी पैसे कमवू शकता.
✓ सामान्यतः घरातील कर्ती व्यक्तीच कमावती असल्याने एकाच ठिकाणी नोकरीला असल्याने एकाच मार्गाने त्यांना पैशाचा ओघ चालू असतो. त्यामुळे म्हणावी तशी मोठी गुंतवणूक करता येत नाही अथवा बचतही करता येत नाही. आलेला पैसा कुठे निघून जातो, हे त्यालाही समजत नाही.
✓ सामान्य लोकं आणि श्रीमंत लोक यामधील हाच सर्वात मोठा फरक आहे. सामान्य लोकं उत्पन्नाच्या एकाच मार्गावर अवलंबून राहतात. परंतु श्रीमंत लोकं अनेक मार्गांचा उपयोग करून विविध मार्गांनी पैसा कसा प्राप्त होईल याबाबत विचार करत असतात.
✓ रॉबर्ट कियोसाकी यांच्या मताप्रमाणे जर तुम्हाला एखाद्या मार्गाने शंभर रुपये मिळत असतील यापेक्षा तुम्हाला अनेक मार्गाने एक एक रुपया मिळणे नेहमीच फायद्याचे राहील.
✓ कारण तुमचा मुख्य आर्थिक स्रोत जर बंद पडला तर तुमची आर्थिक तारांबळ होईल परंतु तुमचे अनेक मार्गांनी प्राप्त होणारा पैसा असेल तर त्यातील तुमचा कोणताही एक मार्ग जरी बंद पडला याने तुमच्या आर्थिक बाबींवर कसलाही फरक पडणार नाही.
✓ सामान्य लोकं साधारणता नोकरी करणे पसंत करतात. नोकरी मधून मिळणाऱ्या उत्पन्नातून घर खर्च, बचत, गुंतवणूक यासारख्या गोष्टी साधण्याचा प्रयत्न करतात. परंतु याच्या विपरीत श्रीमंत लोकं-उद्योजक व्यवसाय, धंदा यासारख्या अनेक गोष्टी अनेक मार्गांचा अवलंब करतात. ज्यातून पैसा मिळवता येईल, त्या प्रत्येक मार्गांचा शोध घेत असतात. यामुळे त्यांची आर्थिक आवकही मोठ्या प्रमाणावर वाढलेली असते. परिणामी त्यांची बचत आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणावर वाढते.
✓ रिच डॅड पुअर डॅड चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या आयुष्यात अशाच अनेक समस्यांना पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा अनुभव या छोट्या-छोट्या टिप्स मधून आपणाला लाखमोलाचा संदेश देतात.
* सामान्य लोक पैशासाठी कामे करतात परंतु श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात. (Ordinary people work for money but rich people work for money.)
![]() |
सामान्य लोक पैशासाठी कामे करतात परंतु श्रीमंत लोक पैशाला कामाला लावतात. |
✓ रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील याबाबतची ही तिसरी महत्वाची टिप्स म्हणजे पैसा कमावणे, त्याची बचत करणे आणि त्या पैशाला गुंतवणूक करून त्यातून नवीन पैसा उभा करणे होय.
✓ रॉबर्ट कियोसाकी म्हणतात , सामान्य लोकं आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवतात. त्या नोकरीतून मिळालेल्या पैशावर संपूर्ण आयुष्य काढत असतात आणि पैशासाठी कामाला जातात परंतु याच्या उलट श्रीमंत लोकं मिळालेला पैसा, कमावलेला पैसा मोठ्या प्रमाणात बचत करून योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्या पैशातून नवीन पैसा तयार करतात.
✓ सर्वसामान्य लोक जीवनभर पैशासाठी काम करतात कारण त्यांची मानसिकता आणि रूढी परंपरेचे विचार यासाठी त्यांना कारणीभूत असतात. परंतु श्रीमंत माणूस, मळलेल्या विचारांना पुसून टाकून आपली नवी व्याख्या तयार करतो.
✓ अनेक मोठमोठे उद्योजक, व्यवसायिक, गर्भ श्रीमंत लोक आपला पैसा विविध ठिकाणी गुंतवतात .ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे कष्ट न करता घरबसल्या नफा मिळत असतो.
* प्रत्येकाकडे सर्वाधिक शक्तिशाली गुण असतो तो म्हणजे, " विचार".(The most powerful quality everyone has is "thinking".)
✓ रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकातील पैशाबाबत असणारी चौथी महत्वाची टिप्स म्हणजे विचार होय.
✓ प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे हवा तेवढा पैसा कमवू शकतो. परंतु त्याचे पैसे कमावण्या बाबतचे विचार सकारात्मक असावयास हवे. श्रीमंत होण्यासाठी निव्वळ पैशाची गरज नसून त्याबाबतचा विचार करण्याचा दृष्टिकोन ही तेवढाच महत्त्वाचा असतो.
✓ एखादा चांगला विचार त्याच्या जीवनात मोठा अमुलाग्र बदल घडवून आणतो, अनेक मोठे उद्योजक, व्यवसायिक आपल्या चांगल्या विचारांमध्ये नेहमी ठाम असतात, दृढ असतात.
✓ चांगले विचार हे तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी आवश्यक असतात.
✓ रॉबर्ट कियोसाकी आपल्या लहानपणाच्या आयुष्यात नेहमी पैशाबाबत विचार करत असे, त्यामुळे त्यांना पैसा मिळवणे सोपे वाटू लागले. कारण एखाद्या गोष्टीतील सराव तुम्हाला त्या क्षेत्रात सर्वोच्च पदापर्यंत नेतो.
✓ तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली आणि त्याबाबत सकारात्मक विचार करत राहिला तर, ती गोष्ट अगदी सहजपणे पूर्ण होते. परंतु अडखळत, नकारात्मक दृष्टिकोन करत राहिलात तर ती गोष्ट पूर्ण होत जरी असली, तरीही अपूर्ण राहते.
✓ रिच डॅड युवर डॅड या पुस्तकानुसार जसे तुम्ही विचार करता त्या पद्धतीने तुमचे आयुष्य बनत असते.
* वाढणारी आणि थांबणारी गुंतवणूक यातील फरक वेळीच समजून घ्या. (Understand the difference between growing and stopping investments in time.)
![]() |
वाढणारी आणि थांबणारी गुंतवणूक यातील फरक वेळीच समजून घ्या. |
✓ रॉबर्ट कियोसकी आपल्या अनुभवानुसार सांगतात की, सामान्य लोकं आणि श्रीमंत लोक यातील फरक हाच आहे की, त्यांची गुंतवणूक करण्याची विचारपद्धती भिन्न-भिन्न असते.
✓ सामान्य लोकं गाडी, बंगला , स्थावर मालमत्ता, दिखाऊपणा च्या गोष्टी ज्यामधून कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ अथवा मिळकत वाढ झाली नसते, अशा गोष्टींमध्ये जास्त गुंतवणूक करतात. कालांतराने अशा गोष्टींमधून नफा होण्याऐवजी तोटा सहन करावा लागतो.
✓ परंतु श्रीमंत लोकं गुंतवणुकीच्या बाबतीत नेहमी वेगळा विचार करतात. जी गुंतवणूक भविष्यकाळात मोठा फायदा मिळवून देईल अथवा मोठा नफा मिळेल अशा ठिकाणी ते गुंतवणूक करीत असतात. जसे की म्युच्युअल फंड, मेडिक्लेम आणि ज्या स्थावर-जंगम मालमत्ता ची किंमत भविष्यात वाढतच राहील, अशा ठिकाणी ते आपली गुंतवणूक करतात.
✓ योग्य ठिकाणची गुंतवणूक भरघोस नफा मिळवून देणारी असते. याविषयीचे परिपूर्ण ज्ञान श्रीमंत लोक नेहमी मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात.
✓ आलेल्या पैष्याबाबत, खर्च कमी आणि गुंतवणूक जास्त याप्रमाणे सर्वांनी वापर करायला हवा, त्यामुळे मिळणारा परतावा नफ्याचा ठरतो.
(आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल.
मित्रांनो,
रिच डॅड पुअर डॅड या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी हे स्वतः अरबपती असून लहानपणी त्यांनी खूप हलाखीची आणि गरिबीची परिस्थिती भोगलेली आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण जीवन कालावधीत पैसा आणि त्याचे महत्त्व याबाबतचा संपूर्ण अनुभव या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे या लेखात दिलेल्या टिप्स, रोबोट कियोसाकी यांचा संपूर्ण जीवनभराचा अनुभव तुम्हाला अनुभवयास मिळालेला असेलच. या विचारांची आपल्या जीवनात सांगड घातली तर नक्कीच श्रीमंत होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.
धन्यवाद.......!!
अभिप्राय :-
सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या माहिती ने तुमच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण निर्माण झाले असतीलच, तसेच या प्रमाणे आवडलेली माहिती, इमेजेस, मेसेजेस आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
तुमचे योगदान :-
मंडळी तुमच्या मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी माहिती असेल जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.
आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.
आम्हाला linkdin वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.








0 Comments
Thanks, for your comments.