तुमची कोणतीही अडचण / समस्या अशी सोडवा. सुटणारच./ Solve any problem you have. Will leave.
राम राम मंडळी,
टीम मराठीचा मास्तर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो, एका भन्नाट अशा आकर्षक लेखामध्ये....
जीवनात प्रत्येकालाच अडचणी, समस्या ह्या पावलोपावली असतातच. अडचण, समस्या नसलेला माणूस शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. कारण जोपर्यंत माणूस जिवंत आहे, तोपर्यंत जीवनाचा रस्ता हा अडचणींच्या खाचखळग्यांनी भरलेला असतो. जेव्हा तुमच्या जीवनाची गाडी थांबलेली असेल त्याचवेळेस हे अडचणींचे खाचखळगे संपतील.
अशा कितीतरी छोट्यामोठ्या अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्या येताना लहान-मोठा, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव करत नाहीत. परंतु या अडचणी म्हणजे जीवनाचा पूर्णविराम नाहीत. ह्या अडचणीच्यापूर्वी ही जीवन चालूच होते आणि अडचणी सुटल्यानंतरही आपले जीवन चालूच राहणार आहे.
अडचण म्हणजे तात्पुरता अडथळा, जोपर्यंत ती सुटत नाही तोपर्यंत दुसरी हजर असते. त्यामुळे प्रत्येक अडचण, समस्या सकारात्मक मनाने हसत हसत सोडवली अथवा उपाय काढले तर नक्कीच सुटते आणि सुटणारच...
मित्रांनो, या लेखामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी, समस्या, अडथळे यांवर सहजरित्या कशी मात करायची. आपल्या यशाच्या गाडीला लागलेल्या या अडचणीच्या ब्रेकला सुरळीत कसे करायचे ? याविषयीची माहिती या लेखात समाविष्ट करण्यात आलेली आहे. चला तर मित्रांनो, आपल्या यशस्वी जीवनाची घोडदौड कोणत्याही अडचणी, समस्येवीना कशी पार पाडायची ? याविषयीची माहिती पाहूया.
तुमची कोणतीही अडचण / समस्या अशी सोडवा. सुटणारच../ Solve any problem you have. Will leave.
(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master यांचेकडेच राहतील.)
* अडचण/समस्या काय आहे. ? हे कळणे सर्वात महत्त्वाचे. (What is the problem? ? This is the most important thing to know.)
✓ प्रत्येकाच्या जीवनात, मग तो व्यक्ती लहान असो अथवा मोठा, श्रीमंत असो अथवा गरीब, अडचणी, समस्या ह्या आहेतच. परंतु त्याने त्यांच्या मुळाशी जाऊन ती समस्या समजून घेणे, खूप गरजेचे असते.
✓ ह्या अडचणी, समस्या माणसाच्या जीवनात उलथापालथ करतात. स्वतःची असेल तर मानसिकता बिघडवते, कुटुंब, मित्रपरिवार, नातेसंबंध यांच्याशी संबंधित असेल तर ते संबंध तुटले जातात. जीवनात मोठे दुष्परिणाम भोगावे लागतात.
✓ परंतु अशा मोठमोठ्या दुष्परिणाम करणाऱ्या समस्यांचे मूळ कारण मात्र क्षुल्लक असते. अगदी काहीश्या गैरसमजातून अथवा अनभिज्ञ कृतीतून, चुकीच्या पद्धतीने वाढलेला विचार माणसाला भांडणाच्या आणि दुःखाच्या खोल दरीत ढकलत असतो.
✓ असा निष्कर्ष काढला जातो की, जगातील सर्वाधिक अडचणी, समस्या ह्या एकमेकांच्या गैरसमजातूनच उत्पन्न झालेल्या असतात. त्या जर वेळीच मिटवल्या नाहीत तर अर्थाचे अनर्थ व्हायला वेळ लागत नाही.
✓ त्यामुळे प्रत्येक अडचणींचे मूळ कारण असतेच. फक्त ते मूळ कारण शोधण्यासाठी त्या अडचणीच्या खोलात जाऊन ते समजून घेतल्याशिवाय उमजत नाही.
✓ जीवनातील कितीही लहानात लहान अथवा मोठ्यात मोठी अडचण असेल तर त्यावर उपायही असतोच. परंतु त्या अडचणीची उत्पत्ती कशी, कोठून किंवा केव्हा झाली ? याबाबतची माहिती ही कळणे महत्त्वाचे असते.
✓ एकदा का, अडचण समस्या कळू लागली की त्यावरचे उपाय ही मिळू लागतात. यामुळे भविष्यात होणारे मोठे दुष्परिणाम वेळीच रोखले जाऊ शकतात.
✓ अडचण आली तिथे उपाय ही असतातच. त्यामुळे अडचणींचा पूर्ण अभ्यास करून खोलात जाऊन मिळवलेल्या माहितीने, अगदी कमीत कमी कालावधीत त्यावर उपाय शोधले जाऊ शकतात.
* अडचण / समस्या कशी उत्पन्न झाली याबाबत भूतकाळ तपासा. (Investigate the past to see how the problem arose.)
✓ एखादी अडचण अथवा समस्या जेव्हा जीवनात न सांगताच येते त्यावेळेस माणसाची मानसिकता ही खालावलेली असते. ताण-तणाव, वाद-विवाद शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेले असतात.
✓ प्रत्येक अडचण ही छोट्या-मोठ्या कारणातून निर्माण होत असते. अशा कारणांचा शोध घेणे, नेहमी चालूच ठेवावे. यासाठी थोडासा भुतकाळ ही पाहणे गरजेचे असते.
✓ विविध प्रकारची कारणे ही छोटी अथवा मोठी असू शकतात. जसे की गैरसमजातून उत्पन्न झालेल्या अडचणी, त्रयस्थ व्यक्ती मार्फत उत्पन्न झालेल्या अडचणी, मित्र परिवार, नातेवाईक यांच्या पूर्ववैमनस्यातून निर्माण झालेल्या अडचणी, असे अनेक भूतकाळातील धागेदोरे बाहेर येऊ लागतात.
✓ जोपर्यंत भूतकाळात होऊन गेलेल्या घटनांचा मागोवा घेतला जात नाही, तोपर्यंत त्या अडचणीवर उपाय काढणे कठीण होते व अडचण सोडवणे अवघड होऊन बसते. भविष्यात ती समस्या पुन्हा उत्पन्न होणार नाही. यासाठी भूतकाळ पाहणे ही खूप महत्त्वाचे असते.
✓ ह्या जीवनात धकाधकीच्या युगात नकळतरित्या झालेल्या अनेक घटना, वर्तमानात आपल्या विस्मृतीत जातात. त्यामुळे भूतकाळात झालेल्या चुकीच्या गोष्टीमुळे भविष्यातील अडचण, समस्या ही हात जोडूनच तुमचे स्वागत करीत असते. अशा वेळी वर्तमानकाळात माणूस त्यापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत असतो.
✓ ज्यावेळेस भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टींचा मागोवा घेतला असता, स्वतःच्या अडचणींची स्वतःलाच अनुभूती झाल्याचा साक्षात्कार होऊन जातो. तेव्हा ती स्वतःची चूक, स्वतःच मान्य करून प्रत्यक्षात ती समस्या कळू लागते.
* अडचणींवर जास्तीत जास्त किती उपाय काढू शकतो, हे सकारात्मक विचार वारंवार करत रहा. (Keep rehearsing it until you can say it with conviction and confidence.)
✓ एखादी अडचण अथवा समस्या कितीही छोटी असू द्या अथवा मोठी असू द्या. सारखा-सारखा तिचा पुनरुच्चार करून स्वतःची अथवा कुटुंबाची मानसिकता खराब करू नका. यामुळे वाद-विवाद अथवा अडचण वाढू शकते.
✓ अडचण आलीच आहे तर त्यावर फालतू विचार करत बसण्यापेक्षा, सकारात्मक विचार करा. ती सोडवण्याचा वारंवार प्रयत्न करत राहा. सकारात्मक विचारांमुळे एक नाही तर हजारो वाटा, उपाय मिळू लागतात.
✓ नवनवीन उपाय, कल्पना सुचू लागतात. त्यामुळे संबंधित अडचणींचा वाईट काळ लवकरात लवकर संपेल, ही समाधानकारक असणारी मानसिकता तयार होऊन योग्य ती पावले तरी त्वरित उचलली जातात.
✓ उत्पन्न होणारी अडचण जर यापूर्वी आली असेल तर तिचा अनुभव गाठीशी असतोच. परंतु नवीनच अडचणी, समस्या असेल तर त्यावर सकारात्मक विचार करून शोधलेल्या नवनवीन कल्पना, अडचण सोडवण्याबरोबरच आपल्या अनुभवात ही वाढ करत असतात.
✓ त्यामुळे अडचण ही अडचण न वाटता, तो जीवनातील एक छोटासा अडथळा वाटून, अशा हजारो अडचणी सोडवण्याचा आत्मविश्वास जागृत होतो.
* जीवनात अडचणी येतातच, पण अडचणीत जीवन अडकून देऊ नका.(There are always difficulties in life, but don't let life get in the way.)
✓ जीवन हे चढ-उताराचे असतेच. त्यात अनेक अडचणी, समस्यांचे खाचखळगे असतात. यासोबतच आपणाला हसत हसत जगायचे असते. रडतखडत कशातरी काढलेल्या अडचणी, भविष्यात त्या आपल्याला नेहमीच भयावह वाटतात.
✓ प्रत्येकाची अडचण, समस्या सोडवण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली, तरी त्याबाबत सकारात्मक विचार करण्याची मानसिकता मात्र समान असते. त्यामुळे ती मानसिकता प्राप्त करण्याला प्रथम प्राधान्य द्या.
✓ अडचण, समस्या येताना सांगून येत नाहीत. ती लहान-मोठा, श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावतेच.
✓ या अडचणीचे काही महत्त्वाचे प्रकार आहेत जसे की, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, मानसिक अशा प्रकारच्या मुख्य अडचणी, समाजात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळतात. अडचणीच्या कोणत्याही प्रकारात उपरोक्त माहिती प्रमाणे केलेली कार्यवाही करणाऱ्या व्यक्तींसाठी ह्या अडचणी काहीच नसतात.
✓ प्रत्येक अडचण, समस्या ही तुमची परीक्षा घेण्यासाठीच आलेली असते. त्यामुळे तुम्ही स्वतः खंबीर व्हा आणि अडचण सोडवा. यदाकदाचित जर अडचण सुटलीच नाही तर लोकांना सांगत बसू नका. झालंच तर अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.
✓ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असतेच. त्यामुळे तुमची अडचण हे तुमचे जीवन कधीच निश्चित करू शकणार नाही. कितीही मोठी अडचण असेल, तर तिला खंबीरपणे मोठ्याने ओरडून सांगा, " माझ्या जीवनात अशा खूप अडचणी आहेतच, परंतु या अडचणींमध्ये माझे जीवन कदापीही अडकू देणार नाही."
मित्रांनो,
लहान मुलापासून, वृद्ध व्यक्तींपर्यंत प्रत्येकाचीच समस्या, ही प्रत्येकाला मोठी वाटत असते. परंतु तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एकदा बदलला की, आपलंच जीवन आपल्याला आनंदात असल्यासारखे वाटू लागते. प्रत्येक अडचण, समस्या केव्हा ना केव्हा संपणारच आहे. परंतु तुमची लढण्याची आणि जगण्याची हिंमत मात्र दुप्पट होणार आहे, हे ही लक्षात ठेवायला मात्र विसरू नका. क्षमता प्रत्येकात असतेच. वेळीच त्या क्षमतांची जाणीव झाली अथवा करून घेतली तर अडचणी ह्या क्षुल्लक वाटू लागतात. लेखात दिलेली माहिती सदैव तुमच्या प्रत्येक अडचणी मध्ये ढाल बनून तुमच्या रक्षणाची जबाबदारी करत राहील.
टीम मराठीचा मास्तर सदैव प्रत्येक निर्भिड व्यक्तिमत्त्वाच्या साथ-संगतीत नक्कीच असेल. प्रत्येकाच्या यशस्वी भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद....!!
( आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल.नोकरी सोडून स्वतःचा बिजनेस करायचा आहे. - फक्त पाच स्टेप. Quit your job and start a business - just five steps.)
अभिप्राय :-
सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
तुमचे योगदान :-
मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.
आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.
आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.







0 Comments
Thanks, for your comments.