Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे मार्ग. Easy Ways to Make Money Online.

ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे मार्ग.  Easy Ways to Make Money Online.

राम राम मंडळी,
तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे एका विशेष लेखामध्ये...
पैसा म्हटले की, सर्वांना तो हवाहवासा वाटतो. मग तो मिळवण्यासाठी, वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी प्रत्येक जण दाखवत असतो. पैशाचे महत्व आणि त्याची किंमत खूप असल्याने जीवनातील प्रत्येक गोष्ट आपण सहज पूर्ण करू शकतो, हा विश्वास प्रत्येकात असल्याने लहानपणापासूनच पैशाबाबत विशेष आकर्षण वाटत असते. ज्याच्याकडे खूप सारा पैसा आहे, असा व्यक्ती सर्वात सुखी असतो. अशी आपली एक भोळीभाबडी विचारधारा असते, नव्हे आहेच.

ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे मार्ग.
ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे मार्ग. 

मराठी मध्ये एक म्हण आहे, पाचामुखी परमेश्वर. म्हणजे जास्त लोक एखाद्या गोष्टीबाबत एकच मत प्रकट करत असतील तर ती गोष्ट सत्य मानावी. अगदी याच म्हणीप्रमाणे प्रत्येकाने पैशाला दिलेले महत्त्व, हे आपणाला विशेष वाटू लागते. मग सुरु होतो, तो प्रवास पैशासाठी, रात्रंदिवस कष्ट करण्याचा....
मित्रांनो, या धावत्या युगात पैसे कमवण्याचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. ऑनलाइन पद्धतीने खूप सारे लोक पैसा कमावत आहेत. थोड्याशा बुद्धीच्या, कौशल्याच्या बळावरही माणसे अमाप पैसा कमवत आहेत.
खरंच मित्रांनो, ऑनलाईन पैसे कमवता येतात का ? येत असतील तर तो कसा ? कोणकोणते मार्ग असतात ? ह्या गोष्टी विश्वासपूर्ण आणि खऱ्या असतात का ? तर मित्रांनो तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे याच लेखामध्ये पाहायला मिळणार आहे.
चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता ऑनलाइन पैसे कमावता येतातच यासाठी कोणकोणते वेगवेगळे मार्ग आहेत त्यांची माहिती पाहुयात...

ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे मार्ग. / Easy Ways to Make Money Online.

* ब्लॉगिंग 
* यूट्यूब 
* फ्रीलान्सिंग
* ग्राफिक डिझाईन
* स्वतःचे ॲप बनवून
* डिजिटल फोटोग्राफी
* ऍफिलीएट मार्केटिंग
* ऑनलाईन सर्विस / कन्सल्टिंग


(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master  यांचेकडेच राहतील.)

ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे मार्ग.
ऑनलाईन पैसे कमावण्याचे सर्वात सोपे मार्ग. 


*  ब्लॉगिंग (blogging) 

✓ ऑनलाईन पैसे कमावण्याचा विश्वासू आणि खरा मार्ग म्हणून ब्लॉगिंगला ओळखले जाते.
✓ ब्लॉगिंग म्हणजे तुम्ही ऑनलाइनरित्या आवडत्या विषयात लिहिलेले लेख होय.
✓ ब्लॉगिंगसाठी तुम्हाला blogger.com या वेबसाईटवर स्वतःचा प्लॅटफॉर्म अथवा वेबसाईट तयार करावी लागते.
✓ ब्लॉगिंगमधून पैसे कमावण्यासाठी गुगल adscence  ची मान्यता मिळणे महत्त्वाचे असते.
✓ गुगल adscence द्वारे तुमच्या ब्लॉगवर जाहिरात दाखवली जाते, त्यामधून आलेला रेव्हेन्यू, यातील काही भाग गूगल स्वतःकडे ठेवून उरलेला भाग तुम्हाला देते. (45 : 55)
✓ एखादा चांगला ब्लॉगर हा सुरुवातीच्या दोन ते तीन महिन्यापासूनच कमाई करायला सुरुवात करतात.
✓ ब्लॉगिंग करण्यासाठी तुम्ही सुरवातीला फ्री मध्ये ही सुरू करू शकता. अथवा डोमेन विकत घेऊन ब्लॉगिंगची सुरुवात मोठ्या आनंदाने करू शकता.
मराठी मध्ये मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग ब्लॉगिंग कडे वळला असून, आज चांगल्या प्रकारची बक्कळ कमाई करत आहेत.

* यूट्यूब ( YouTube )

✓ ऑनलाईन पैसे कमावण्याचा, सर्वात वेगाने प्रसिद्ध होत असलेला सर्वोत्तम दुसरा मार्ग म्हणजे युट्युब होय.
✓ यूट्यूब हा गुगलचाच एक भाग असून यावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ शेअर करून पैसे कमवता येतात.
✓ युट्युब वरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला युट्युब वर तुमच्या जीमेलच्या मदतीने युट्युबवर अकाउंट बनवणे गरजेचे असते.
✓ ज्या विषयात तुम्हाला आवड आहे, असा विषय निवडून तुम्ही चांगल्या क्वालिटीचे व्हिडीओ क्रिएट करून तुमच्या अकाउंटवर ते व्हिडीओ अपलोड करू शकता.
✓ यूट्यूबच्या नियमान्वये, तुम्हाला एक वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि चार हजार तासांचा वॉच टाईम पूर्ण करावा लागतो, त्यानंतर तुमचे चॅनेल पैसे कमविण्यासाठी तयार होते.
✓ तुम्ही काही महिन्यातच हा नियम जरी पूर्ण केला तरी तिथपासूनच पुढे तुमची कमाई सुरू होते.
✓ युट्युब वरून कमाई करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडीफार गुंतवणूक करणे, आवश्यक राहील. यामध्ये व्हिडिओ एडिटिंगसाठी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप, चांगला कॅमेरा, लाइट्स, शांत खोली, उत्तम क्वालिटीच्या आवाजासाठी माइक या प्रकारचे विविध साधने लागतात.
✓ युट्युब वर तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी पाहण्यासाठी त्यामधील तुमची व्हिडिओ क्वालिटी ही सर्वोत्तमच असावयास हवी. त्यामुळे आपल्या आवडीच्या क्षेत्रातील विषयावरच व्हिडिओ बनवा.
✓ युट्युब मध्ये सबस्क्रायबर हा ऑडियन्स महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे तुमच्या व्हिडिओ वर जास्त views येऊन मोठी कमाई होते.
✓ युट्यूब मधून कमाई करणाऱ्या लोकांमध्ये खूप सारे भारतीय युट्युबवर आहेत. यातच महाराष्ट्रातील अनेक मराठी युट्युबवर आपले नाव गाजवत आहेत त्यासोबतच खूप सारा पैसा डॉलरमध्ये मिळवत आहेत.

* फ्रीलान्सिंग ( freelancing )

✓ ऑनलाईन पैसे कमावण्याचा तिसरा साधा-सोपा मार्ग म्हणजे फ्रीलान्सिंग होय.
✓ या मार्गाचे सर्वोत्तम वैशिष्टे म्हणजे तुम्हाला, तुमच्या कामाचे लगेच पैसे मिळतात. यासाठी कोणत्याही प्रकारची वाट पहावी लागत नाही.
✓ फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्हाला ज्या विषयाची सर्वोत्तम आवड आहे, त्याबाबतची ऑनलाईन सेवा, ज्यांना गरज आहे त्यांना देऊन पैसे कमावणे होय.
✓ फ्रीलान्सिंग करण्यासाठी तुम्हाला freelancer.com या वेबसाईटवर स्वतःचे अकाउंट ओपन करावे लागते.
✓ आपल्याला येत असलेल्या कामाचे वर्णन, स्वतःविषयीच्या मुख्य बाबी समाविष्ट कराव्या लागतात.
जगभरातून मोठा ट्राफिक येत असल्याने फ्रीलान्सिंग मधून सर्वोत्तम सेवा देऊन, त्वरीत पैसे कमावता येतात.
✓ यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात. जसे की, फ्रीलान्सिंग साठी तुम्हाला कॉम्प्युटर अथवा लॅपटॉप असणे गरजेचे असते.
✓ उत्तम क्वालिटीचे फोटो बनविणे, काही माहिती अन्य भाषेत ट्रांसलेट करणे किंवा चांगले व्हिडिओ बनवून देणे, वेबसाईट क्रिएट करून देणे अशा प्रकारची विविध ऑनलाइन कामे करून पैसे कमावले जातात.
✓ फ्रीलान्सिंगसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी इंग्रजी भाषा लिहिता- वाचता अथवा संभाषण करण्याकरता येणे गरजेचे असते.

Easy Ways to Make Money Online.
Easy Ways to Make Money Online.

* ग्राफिक डिझाईन ( graffic desion)

✓ ऑनलाईन पैसे कमावण्याचा चौथा सोपा मार्ग म्हणजे ग्राफिक डिझाईन होय.
✓ यामध्ये तुम्ही विविध प्रकारच्या डिझाईन्स थ्रीडी स्वरुपात किंवा स्केच काढून, बनवून पैसे कमवू शकता.
✓ प्रत्यक्षात असलेल्या वस्तू, गोष्टी, महत्त्वाच्या बाबी याविषयीची माहिती स्केचच्या स्वरूपात, पेन्सिलने कॅनव्हासवर रेखाटन करून संबंधित व्यक्तींना अथवा कंपनीला देऊन पैसे कमवू शकता.
✓ अनेक लोकांना घरासाठी, कंपनीसाठी, वेबसाईट स्ट्रक्चर, बॅनर, ऑफिस मीटिंग डिझाईन, यासाठी ग्राफिक डिझाईनरची आवश्यकता असते.
✓ ग्राफिक डिझाईनचे अनेक कोर्सेस पण उपलब्ध आहेत. या क्षेत्रात तुमच्या टॅलेंटला खूप महत्त्व असते.
✓ अशा या मार्गासाठी तुम्हाला अगदी छोट्या-छोट्या उत्कृष्ट कामासाठी, लोक लाखो रुपये मोजतात.
✓ महाराष्ट्र मध्ये मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात ग्राफिक डिझायनरला मोठी मागणी असते.
✓ ग्राफिक डिझाईनरसाठी तुम्ही एखादा कोर्स करून किंवा गूगल यूट्यूबच्या मदतीने अथवा माहितीद्वारे ज्ञान मिळवू शकता.

* स्वतःचे ॲप बनवून. (Create own app)

✓ आज-काल प्रत्येकाकडे मोबाईल असतोच. त्यामध्ये विविध प्रकारचे ॲप आपण डाउनलोड केलेले असतात.
याच ॲपच्या मदतीने ऑनलाईन पैसे कमवता येतात.
✓ स्वतःचे ॲप तयार करून, ऑनलाईन पैसे कमावण्याचा हा ही एक सोपा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला विविध ॲप बनवणाऱ्या ब्राउझरचा अथवा वेबसाइटचा वापर करावा लागेल.
✓ तुमच्याकडे असणारे विशेष ज्ञान, माहिती ही ॲपच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवून बक्कळ पैसे कमावण्याचा मार्ग आहे.
✓ ॲप बनवण्यासाठी appy pie, appsheet, good barber, yapp, bizness app, shoutem या प्रकारच्या कोणत्याही एका वेबसाईटच्या मदतीने स्वतःचे ॲप बनवू शकता.
✓ ॲप बनवून झाल्यानंतर गुगल प्ले स्टोअरला तुमचे ॲप, ॲड करण्यासाठी सुरुवातीचे $25 डॉलर तुम्हाला मोजावे लागतात.
✓ एकदा ॲप बनवल्यानंतर तुमची कायमची इन्कम सुरू होते, परंतु यासाठी ट्रॅफिकही तेवढाच मोठा असावा लागतो.
✓ हे ॲप वेळोवेळी कालांतराने अपडेट ही करावे लागते. आज-काल भरपूर मराठी लोक असे मराठी, हिंदी, इंग्लिश भाषांमध्ये ही ॲप बनवून चांगला पैसा कमावत आहेत.

* डिजीटल फोटोग्राफी (digital photography)

✓ तुम्हाला जर उत्तम क्वालिटीचे फोटो काढता येत असतील तर ऑनलाइन पैसे कमावणे, तुमच्यासाठी सोपे आहेत.
डिजिटल फोटोग्राफी म्हणजे उत्तम कॉलिटीचे फोटो काढून ऑनलाइनद्वारे विविध वेबसाईटच्या माध्यमातून विकून, पैसे कमावणे होय.
✓ विविध प्रकारच्या वेबसाइट जसे की, Shutterstock, istockphoto, Adobe stock या माध्यमातून इमेज,  डॉलर मध्ये विकून पैसे कमवता येतात.
✓ डिजिटल फोटोग्राफी मधून पैसे कमवण्यासाठी गुंतवणूक म्हणून तुमच्याकडे फोटो काढण्यासाठी, उत्तम क्वालिटीचा कॅमेरा, फोटो एडिटिंग साठी लागणारे लॅपटॉप, कॉम्प्युटर आवश्यक असते.
✓ तसेच यासाठी तुम्हाला फोटो काढण्याचा छंद, आवड ही असायला हवी. यामुळे तुम्ही, आपल्या आवडीच्या कामातून चांगल्या प्रमाणात पैसा कमावू शकता.

* ऍफिलीएट मार्केटिंग (affiliate marketing )

ऍफिलीएट मार्केटिंग म्हणजे ऑनलाइन प्रॉडक्ट, विविध कंपन्या विकत असतात. ते प्रॉडक्ट आपल्या account च्या माध्यमाद्वारे विकून पैसा कमावणे होय.
✓ जसे की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अलीबाबा यांसारख्या विविध प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपन्या आणि ग्राहक यांच्यामधील छोटासा दुवा होय. यामधून चांगल्या प्रकारचे परसेंटेजच्या रूपात पैसे मिळतात.
✓ ऍफिलीएट मार्केटिंग हा ऑनलाईन पैसे कमवण्याचा सर्वात मोठा मार्ग होय. पावलोपावली तुम्हाला या क्षेत्रातील लोक मार्केटिंग करताना दिसतात.
✓ काहीना काही प्रॉडक्ट ते या वेबसाईटच्या माध्यमातून विकत असतात. यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर अकाउंट ओपन करणे गरजेचे असते. त्यामुळे विविध प्रॉडक्ट विकणे सोपे होते.
✓ महिन्याला पंचवीस हजार ते एक लाख रुपये पर्यंत सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता. यामध्ये कोणतीही गुंतवणूक नसून फक्त विक्री कौशल्याचेे ज्ञान असणे, आवश्यक असते.

* ऑनलाईन सर्विस / कन्सल्टिंग ( online service / consulting )

ऑनलाईन सर्विस / कन्सल्टिंग हा ऑनलाईन पैसे कमावण्याचा एक चांगल्या प्रकारचा मार्ग, आजकाल आपल्या भागात आजूबाजूच्या प्रदेशात आपण पाहतोच आहेत.
✓ यामध्ये तुम्हाला ई-बुक विविध प्रकारचे मार्गदर्शन किंवा  एखाद्या आवडीची माहिती, ऑनलाइन स्वरूपात पैसे घेऊन देता येते.
✓ ऑनलाईन सर्विस यामधून पैसे कमावताना तुमची आवड असणाऱ्या क्षेत्रातून किंवा विषयांमधून तुम्हाला पैसे मिळू शकतात. जसे कुकिंग करणे, क्लास घेणे,मोटिवेशन माहिती देणे, प्रेरणात्मक विचार, संभाषण करणे याद्वारे सेवा देऊ शकता .
✓ यामध्ये गुंतवणूक म्हणून एखादा लॅपटॉप अथवा कॉम्प्युटर, उत्तम आवाजासाठी माईक, व्हिडिओ साठी कॅमेरा असणे बंधनकारक असते.
✓ सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या ऑनलाईन सर्विस देणाऱ्या विषयाचे संपूर्ण ज्ञान असणे, आवश्यक असते.
लॉकडाऊन मध्ये सर्वात तेजीत असलेला हा मार्ग पैसे मिळवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

Easy Ways to Make Money Online.
Easy Ways to Make Money Online.


मित्रांनो,
या लेखामध्ये दिलेले विविध प्रकारचे मार्ग तुम्हाला ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी सर्वोत्तमच आहेत. फक्त सुरुवात करणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्ही लवकरात लवकर पैसा कमावून आर्थिक स्वावलंबी होऊ शकता. यापैकी जो मार्ग तुम्हाला सोपा, प्रामाणिक वाटला आणि आवडला असेल, तो निवडून आजपासूनच सुरुवात करा. " प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे ", या म्हणीप्रमाणे तुमच्या प्रयत्नाला नक्कीच यश येईल. 
तुमच्या प्रत्येक भावी वाटचालीस टीम मराठीचा मास्तर कडून खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद....!!

अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

तुमचे योगदान :-    

                  मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
 
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.

आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.


Post a Comment

0 Comments