Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे - ज्ञान तेथे मान. Reading is important for success - respect knowledge there.

 यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे - ज्ञान तेथे मान. Reading is important for success - respect knowledge there.

राम राम मंडळी,
टीम मराठीचा master तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो, एका वाचनीय लेखामध्ये...
मित्रांनो, अनेक वेळा आपल्याला कोणत्याही कामासाठी गोष्टीसाठी माहिती आवश्यक असते आणि ती न मिळाल्याने आपले ते काम अथवा ती गोष्ट, पूर्ण करण्यास अडचण निर्माण होते. तर मग यासाठी आपण विविध सोशल मीडियाचे माध्यम, पुस्तके, अनुभवी लोकांचे मार्गदर्शक विचार या सर्वांमधून हवी ती माहिती मिळवितो. परंतु प्रत्येक वेळेस आपल्या यशस्वी जीवनासाठी, लागणारी माहिती योग्य वेळी मिळतेच, हे ठाम सांगता येणार नाही.

यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे - ज्ञान तेथे मान.
यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे - ज्ञान तेथे मान.

आजच्या धकाधकीच्या युगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे. मग तो त्यासाठी प्रयत्न तर करतोच करतो. परंतु त्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान पुरेसे काही घेत नाही. यामुळे थोडेसे अपयश आले तर खचून, ते काम अथवा ती गोष्ट सोडून देतात. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, जसे की, शिक्षण, शेती, नोकरी-व्यवसाय सर्वच ठिकाणी स्पर्धा आहेच आणि ती कायम राहणार आहे. परंतु या भाऊगर्दीत आपला वेगळा ठसा उमटवण्यासाठी आपल्याला, आपल्या क्षेत्राचं परिपूर्ण ज्ञान, माहिती असायलाच हवी. त्यासाठी सर्वोत्तम पर्याय असतो, तो म्हणजे वाचन.

Reading is important for success - respect knowledge there.
Reading is important for success - respect knowledge there.


वाचनाने, माणूस माणसात येतो. निसर्गात सर्वश्रेष्ठ बुद्धिमान प्राणी म्हणून माणसाला ओळखले जाते. अशा या बुद्धिमान माणसांमध्ये आपली ओळख, आपल्या ज्ञानाने कमवावी लागते. चला तर मग आपल्या ज्ञानाच्या वाढीसाठी, वाचनाचे अविश्वसनीय असणारे महत्त्व जाणून घेऊया.

यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे - ज्ञान तेथे मान. Reading is important for success - respect knowledge there.

* अर्धवट ज्ञान काही कामाचे नसते.
* वाचनामधून मिळालेल्या नोंदींचा संग्रह ठेवा.
* दररोज काहीना काही वाचनाची सवय लावा.
* वाचनाने दृष्टी नाही तर दृष्टिकोण बदलतो.

(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master  यांचेकडेच राहतील.)

* अर्धवट ज्ञान काही कामाचे नसते. ( Partial knowledge is of no use.)

अर्धवट ज्ञान काही कामाचे नसते.
अर्धवट ज्ञान काही कामाचे नसते. 

✓ समाजात, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये ज्या वेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तुमचे महत्त्व किंवा किंमत ही तुम्ही प्रकट केलेल्या विचारामधूनच होत असते. समोरील जनसमुदाय अथवा व्यक्ती, तुमच्या विचारांप्रमाणेच तुम्हाला मान-सन्मान देत असतात.
✓ तुम्हाला ज्या काही कोणत्याही क्षेत्राची आवड असेल, छंद असेल, काम करण्याची इच्छा असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रातील इत्यंभूत माहिती तुम्हाला असावयास हवी. इतरांपेक्षा वेगळे ज्ञान, तेव्हाच मिळते जेव्हा तुमचे काम आणि विचारही इतरांपेक्षा वेगळे असेल.
✓ तुमच्या क्षेत्रातील असलेल्या तुमच्या ज्ञानाच्या बळावर समाजातील व्यक्तींना, लोकांना तुमचे व्यक्तिमत्व वारंवार दिसून येते. ज्ञानाने परिपूर्ण असणारा माणूस इतरांपेक्षा वेगळा याच कारणामुळे ठरतो.
✓ विषयाबाबतचे संपूर्ण ज्ञान असल्याने मित्रमंडळींमध्ये, नातेवाईकांत होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये तुमचा हशा होत नाही, तर उलट लोक तुम्हाला चांगल्या मार्गदर्शकाच्या रूपात पाहत असतात.
✓ तुमची ओळख ही तुमच्या चारित्र्य गुणसंपन्न विचारांवर अवलंबून असते. यशस्वी होण्यासाठीचा महत्त्वपूर्ण टप्पा तुमची ओळख असते. यासाठी ज्ञानाचा साठा तेवढ्याच प्रमाणात असावयास हवा.
✓ कोणत्याही क्षेत्रात अर्धवट ज्ञानाने केलेली सुरुवात ही अपयशाला आणि तोट्याला आमंत्रित करत असते. म्हणून जीवनातील अगदी छोट्यात छोटी अथवा मोठी कामे करण्यापूर्वी तिचे ज्ञान अवश्य मिळवा.

* वाचनामधून मिळालेल्या नोंदींचा संग्रह ठेवा. (Keep a collection of entries from reading.)

वाचनामधून मिळालेल्या नोंदींचा संग्रह ठेवा.
वाचनामधून मिळालेल्या नोंदींचा संग्रह ठेवा.

एक पुस्तक शंभर मित्रांच्या समान असते. याचा अर्थ त्या पुस्तकातील ज्ञान, माहिती, मित्रांकडून मिळणाऱ्या अनुभवापेक्षा लवकर प्राप्त होत असते. प्रत्येक पुस्तकातून हजारो, लाखो रुपये किमतीची माहिती, तुम्हाला प्राप्त होत असते, याची जाणीव हवी.
✓ एखादे पुस्तक वाचताना अथवा वाचून झाल्यानंतर त्यातील माहिती, काही कालावधीनंतर आपल्या विस्मरणात जाते. परंतु आवडलेली माहिती अथवा महत्वपूर्ण लेख, जर तुमच्या जीवनाला कलाटणी देणारे असतील तर त्यासाठी पुन्हा पुस्तक वाचावे लागते. परंतु तुम्ही जर त्यातील विशेष बाबींची, माहितीची नोंद करून ठेवली तर त्या पुस्तक वाचनाची प्रति अनुभूती प्राप्त होते.
✓ एखाद्या चांगल्या पुस्तकातील आवडलेली माहिती पुन्हा अनुभवण्यासाठी ते पुस्तक वारंवार वाचण्याची गरज नसते. कारण तुम्ही काढलेल्या नोंदीमुळे तुमच्या वेळेची बचत होते. या नोंदीमुळे कमी वाचनातून अफाट ज्ञान मिळवता येते.
✓ संबंधित लेखकाने ते पुस्तक लिहिताना जीवनातील आलेल्या चांगल्या-वाईट अनुभवांचा एक प्रकारे संग्रह केलेला असतो. त्यामुळे आपणाला लेखकाच्या जीवनभराचा अनुभव, अगदी काही वेळात अनुभवायास मिळतो. त्यामुळे तुमचे ज्ञान कैक पटीने वाढते.
शिक्षण घेत असलेला विद्यार्थी, नोकरी करत असलेल्या नोकरदार , घरकाम करणारी गृहिणी अथवा व्यवसायात उतरलेला व्यवसायिक या सर्वांच्या यशस्वी वाटचालीसाठी, परिपूर्ण ज्ञानाचा भांडार वाचनातूनच तर प्राप्त होतो. जेवढ्या लवकर वाचनाचे महत्व कळते, तेवढ्याच लवकर यश (success) नावाचा जिवलग मित्र तुमच्या आयुष्यात येतो.

* दररोज काहीना काही वाचनाची सवय लावा. (Get in the habit of reading something every day.)

दररोज काहीना काही वाचनाची सवय लावा.
दररोज काहीना काही वाचनाची सवय लावा

✓ प्रत्येक व्यक्तीचा दिवस चांगला जाण्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते आणि चांगल्या विचारांसाठी वाचन ही तेवढेच महत्त्वाचे असते. सकारात्मक विचारांनी जर माणसाची सुरुवात झाली तर संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात पार पडतो.
✓ सकारात्मक विचार तुमच्यामध्ये आपोआप येत नाहीत तर ते वाढवावे लागतात. त्यासाठीचे कष्ट घ्यावे लागते. यासाठी तुम्हाला सर्वोत्तम नैसर्गिक एकमेव असलेला पर्याय म्हणजे वाचन होय. 
✓ अनेकांना वाचण्याचा कंटाळा येतो. वाचन नीरस आणि बेचव वाटत असते. परंतु यशस्वी होणे, म्हणावे तेवढे सोपे नसते. प्रत्येकाला ते जमतेच असे नाही. म्हणूनच अगदी मोजकीच लोक यशस्वी होतात. वाचनासाठी लागणारी सवय, यशस्वी लोकांच्या अंगात जरा जास्तच भिनलेली असते. 
✓ चांगल्या ज्ञानासाठी रोजचे वाचन हवे आणि रोजच्या वाचण्यासाठी योग्य सवय लागते. परंतु चांगली सवय निर्माण होण्यासाठी त्या गोष्टीची सुरुवात करणे आणि त्या सवयीत सातत्य ठेवणे, नेहमीच महत्त्वाचे असते.
✓ जगप्रसिद्ध यशस्वी व्यक्ती बिल गेट्स, वॉरेन बफे आजही आपल्या जीवनातील बहुमूल्य असणारा वेळ वाचनासाठी देतात. 
✓ वाचनाची सवय लावण्यासाठी तुम्ही छोटेसे नियोजनही करू शकता. यासाठी दररोज एक पान वाचा. काही आठवड्यांनी त्यात वाढ करून पानांची संख्या वाढवा. हळूहळू केलेला बदल नक्कीच तुमची सवय बनून जाते. वाचनाची आवड निर्माण होते.
✓ आपल्या फायद्याची गोष्ट असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. अगदी याचप्रमाणे प्रत्येक पुस्तक आपल्या फायद्यासाठीच आहे, अशा उद्देशाने केलेल्या सकारात्मक विचारातून तुम्हाला उत्तम प्रकारे वाचनाची आवड निर्माण होईल.
✓ वाचनाची सवय लागता-लागता तुमच्यातील शिस्तही वाढू लागते. प्रत्येक काम वेळेत पूर्ण होते. परिपूर्ण ज्ञान, माहिती मिळू लागते. यामुळे त्या क्षेत्रातील सर्वोच्च यश तुमची वाट पाहतच असते.

* वाचनाने दृष्टी नाही, तर दृष्टिकोण बदलतो. ( Reading changes vision, not vision.)

वाचनाने दृष्टी नाही, तर दृष्टिकोण बदलतो.
वाचनाने दृष्टी नाही, तर दृष्टिकोण बदलतो.

✓ विनोदाची गोष्ट म्हणजे सकारात्मक विचारांच्या वाढीसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात परंतु नकारात्मक विचार न सांगताही, न बोलवताही येतात. कदाचित यासाठी बदलती जीवनशैली ही तेवढीच कारणीभूत असेल.
✓ दिवसभरात हजारो विचार डोक्यात येतात आणि जातातही. परंतु यामधील कोणत्या विचारांना महत्त्व द्यायचे अथवा कोणते विचार आपल्या फायद्याच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीकोनातून योग्य आहेत, हे समजण्यासाठी वाचन महत्त्वाचे असते.
✓ बदलत्या धावत्या युगात, समाजातील चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी आपली दृष्टी नाही तर योग्य दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे आणि हा दृष्टिकोन अभ्यासपूर्ण वाचनातून प्राप्त होतो.
✓ प्रत्येक गोष्टीतील, माणसातील, विचारांमधील आपल्याला चांगले दिसू लागते. जीवनात आलेल्या अपयशातसुद्धा लाखमोलाचा अनुभव पाहण्याचा दृष्टिकोन वाचनामुळेच दिसू लागतो.
✓ यशस्वी व्यक्तींच्या प्रत्येक विचारांमध्ये, कामांमध्ये अथवा जीवनात एक वेगळेपण असते. एकदा का, ते जमले तर तुमची ही गणती, यशस्वी लोकांमध्येच होते. लक्षात ठेवा, वाचनाने माणूस परिपूर्ण होतोच.

मित्रांनो,
        यशस्वी तर प्रत्येकालाच व्हायचे आहे. निव्वळ इच्छा बाळगून काही होत नाही. अमाप कष्ट करूनही कमी कालावधीत यश प्राप्त होत नाही. त्यासाठी ज्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे, त्यातील सर्वंकष ज्ञान आवश्यकच आहे. ज्याला वाचन कळले, त्याला यशस्वी होता आले.
मराठी संस्कृतीला फार पूर्वीपासून उल्लेखनिय किमतीची, साहित्यसंपदा लाभलेली असताना नकारात्मक विचारांनी कुंठित राहण्यापेक्षा, सकारात्मक विचारांच्या मानसिकतेचे वाचन तुम्हाला यशस्वी करतेच.
जीवनात यशस्वी होण्यासाठी वाचनाची कास धरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या, पावलोपावली टीम मराठीचा मास्तर सदैव सोबत राहील.
धन्यवाद....!!

 ( आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल. नशीबवान कोण असते - आहे का तुमच्या असे काही. Who is lucky - do you have anything like that .)

अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

तुमचे योगदान :-    

                  मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
 
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.

आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.    

आम्हाला linkdin वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.   


Post a Comment

0 Comments