Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

असे रहा रोज सकारात्मक. Stay positive every day.

असे रहा रोज सकारात्मक. Stay positive every day.

राम राम मंडळी,
विचारांच्या दुनियेत चांगले आणि वाईट विचार प्रत्येक माणसाची दिशा आणि दशा ठरवत असतात. याच विचारांबाबतच्या लेखामध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे.
दिवसभरात अनेक विचार प्रत्येकाच्या मनात येत असतात. परंतु वैज्ञानिक माहितीप्रमाणे यातील पाच टक्‍क्‍यांपेक्षाही कमी विचार आपल्या फायद्याचे असतात. बाकीचे सर्व व्यर्थ असतात. 

असे रहा रोज सकारात्मक.
असे रहा रोज सकारात्मक. 

सकाळी उठल्यापासून, रात्री झोपेपर्यंत संपूर्ण दिवसात असंख्य विचार आपल्या डोक्यात घोळत असतात. काही चांगले असतात तर काही वाईट असतात. ज्या दिवशी वाईट विचार अथवा परिस्थिती वाढते, त्यावेळेस अनेक वाईट घटना आपल्या सोबत घडू लागतात. परंतु चांगल्या विचारांनी ही परिस्थिती बदलता येऊ शकते. सकारात्मक विचारांनी आपले जीवन, दिवस, शिक्षण आनंदी होऊ शकते यासाठी त्यांची वाढ होणे गरजेचे असते. 

Stay positive every day.
Stay positive every day.

प्रत्येक दिवशी आपले विचार सकारात्मक असतीलच किंवा राहतीलच, हे ठाम सांगू शकत नाही. परंतु कष्टाच्या बळावर त्यात परिवर्तन नक्कीच आणू शकतो अथवा वाढ करू शकतो.
या लेखामध्ये सकारात्मक विचार कसे वाढवता येतील ? आणि रोजच्या दैनंदिन जीवनात कसे सकारात्मक राहता येईल ? याबाबतची विशेष माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न.
चला तर मित्रांनो वेळ न दवडता रोज सकारात्मक कसे रहायचे, याविषयीच्या माहितीला सुरुवात करूया.

असे रहा रोज सकारात्मक. Stay positive every day.

(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master  यांचेकडेच राहतील.)

* कोणतीही गोष्ट करणे अशक्य नसते. सकारात्मक विचारांनी सर्व काही शक्य आहे.(Nothing is impossible. Everything is possible with positive thinking.)

कोणतीही गोष्ट करणे अशक्य नसते. सकारात्मक विचारांनी सर्व काही शक्य आहे.
कोणतीही गोष्ट करणे अशक्य नसते. सकारात्मक विचारांनी सर्व काही शक्य आहे.

✓ प्रत्येकाला जीवनात अडचणी, समस्या या येतच राहतात. त्यामुळे दुःखी राहून काहीच न करण्यापेक्षा, आनंदाने हसत हसत त्या स्वीकारा. त्यावर काही उपाय मिळतात का ? यासाठी प्रयत्न सुरू करा. एक सोडून हजारो ऊपाय सापडतील.
✓ अनेक लोकांच्या जीवनात न्यूनगंड नावाचा सर्वात मोठा शत्रू ठाण मांडून बसलेला असतो. यामुळे अनेक होणारी कामे अथवा सोपे वाटणारे जीवन, कठीण बनू लागते. स्वतःच, स्वतःच्या कामाविषयी अथवा इतरांबद्दल संशय बाळगू लागतो, हीच धोक्याची रेषा असते, हे वेळीच ओळखायला शिका.
✓ तुमच्या डोक्यातील विचार, हे तुमच्या संपूर्ण दिवसाचे निर्णय घेत असतात. त्यामुळे एवढ्या साऱ्या विचारांतून जे काही चांगले विचार वाटतात, ते ठेवून बाकीच्या विचारांना बायबाय करायला शिका. यामुळे तुमच्या त्या दिवसाच्या आनंदात दुप्पट वाढ होणारच.
✓ एखाद्या गोष्टीचा केलेला सराव त्या क्षेत्रातील तुम्हाला सर्वोत्कृष्ट पदापर्यंत नेते. याचप्रमाणे सतत सकारात्मक विचारांची केलेली उजळणी, तुमच्यातील चांगल्या विचारांना वाढवत राहते. त्यामुळे ज्या काही असणाऱ्या समस्या अडचणी, ह्या छोट्या वाटू लागतात.
✓ सकारात्मक विचारांमुळे वर्तमानातील तुमच्या कामावर तुमचे लक्ष, जरा जास्तच राहते. भविष्यातील चिंता, समस्या भविष्यावर सोडून देण्यास तुम्ही तयार होता.  अशा पद्धतीने " अशक्य ते शक्य " हा प्रवास तुमच्या सकारात्मक विचारांनी सहज पार पाडला जातो. एकदा करुन तर पहा.

* प्रत्येक समस्येवर उत्तर असतेच. त्यामुळे चिंतेत क्रांती करण्याची काहीच गरज नाही.(There is an answer to every problem. So there is no need to revolutionize anxiety.)

प्रत्येक समस्येवर उत्तर असतेच. त्यामुळे चिंतेत क्रांती करण्याची काहीच गरज नाही
प्रत्येक समस्येवर उत्तर असतेच. त्यामुळे चिंतेत क्रांती करण्याची काहीच गरज नाही

✓ प्रत्येकाच्या जीवनातील समस्या, अडचणी ह्या छोट्या किंवा मोठ्या असतात. यांविषयी जे जास्त विचार करतात, त्यांनाच सदासर्वकाळ त्या भेडसावत राहतात. परंतु त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा जरी बदलला तरी आपल्या मूर्ख विचारांवर, आपणालाच हसू येईल.
✓ कोणतीही समस्या उत्पन्न होते, ती आपल्या कर्मामुळेच. आणि त्यावर उत्तर ही मिळते आपल्या कर्मामुळेच. त्यामुळे तुमच्या अभ्यासाने, अनुभवाने, ज्ञानाने, विचाराने अशा समस्येचे निराकरण करणे सदैव उचित राहते. 
समस्या तोपर्यंत अवघड वाटू लागते, जोपर्यंत एक सारखा विचार आपण करत राहतो. त्याबाबतचा विचार करण्याचा थोडा जरी दृष्टिकोन बदलला तरी समस्येबाबतचे आपले विचार हळूहळू बदलू लागतात. आणि त्यावरचे अनेक उत्तरे आपोआप आपल्याला मिळू लागतात. दिवसभरातील चांगल्या वाईट गोष्टींना आपणच तर कारणीभूत असतो.
✓ कोणत्याही समस्येला अथवा अडचणींना किती वेळ द्यायचा अथवा त्यावर किती विचार करायचा ही मानसिकता, एकदा तुम्हाला समजू लागली की, तुमचे पॉझिटिव्ह राहणे सोप्पे होऊ लागते.

* दररोज पाच पाने ( पुस्तकाची ) वाचा. आवड जोपासा. (Read five pages (of the book) every day. Cultivate love)

दररोज पाच पाने ( पुस्तकाची ) वाचा. आवड जोपासा.
दररोज पाच पाने ( पुस्तकाची ) वाचा. आवड जोपासा.

✓ एक पुस्तक शंभर मित्रासमान असते, असे बोलले जाते. त्यामुळे अनेक मित्र आणि त्यांची संगत कमावण्यापेक्षा मोचक्याच पुस्तकांना आपले मित्र माना, त्यामुळे तुमच्या चांगल्या अनुभवात नक्कीच वाढ होईल.
✓ सकारात्मक विचार वाढण्यासाठी विचारांची पण तेवढीच आवकही तुमच्यात होणे गरजेचे असते. चांगल्या प्रमाणात विचारांचा साठा वाढवावा लागतो. हे नवनवीन विचार येण्यासाठी सर्वोत्तम माध्यम म्हणून पुस्तके मानली जातात. त्यामुळे आपल्या सोयीनूरूप पुस्तके वाचनाची आवड जोपासा.
दररोज पाच पाने याप्रमाणे सुरू केलेला उपक्रम तुमच्या चांगल्या विचारांमध्ये अथवाा सवयींमध्ये वाढ करण्यास नेहमीच उपयुक्त राहील आणि प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारा सर्वोत्तम अनुभव ही आपोआप तयार होत राहील.
✓ पुस्तकांसोबतच तुम्ही स्वतःला आवडणारे छंद, आवड हे ही जोपासू शकता. दररोजच्या काही वेळामधून थोडासा वेळ या गोष्टींसाठी अवश्य काढाच. यामुळे तुमचे मन, डोके, विचार रिफ्रेश होतात.
✓ सकारात्मक विचार येण्यासाठी, विविध पण चांगल्या विचारांचे स्रोत वाढवा. पुस्तके, स्वतःची आवड, विविध नवोपक्रम याद्वारे ते वाढवत न्या. ज्या गोष्टीतून आपणाला आनंद प्राप्त होतो, त्यासाठी दिवसातील काही वेळ अवश्य द्याच.

* प्रेरणेचे स्रोत वाढवा, सकारात्मक विचार आपोआप वाढू लागतील. (Increase the source of inspiration, positive thoughts will automatically increase.)

प्रेरणेचे स्रोत वाढवा, सकारात्मक विचार आपोआप वाढू लागतील.
प्रेरणेचे स्रोत वाढवा, सकारात्मक विचार आपोआप वाढू लागतील. 

✓ तुमच्या आवडीच्या कामांतून मिळणारा आनंद हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा प्रेरणेचा स्रोत असतो, तो अखंडपणे वाढवत राहा. ज्यामुळे तुम्ही आनंदी आणि उत्साही राहु लागाल.
✓ आपल्या ओळखीतील अथवा मित्रपरिवारामधील आदर्शवत मार्गदर्शक व्यक्तींसोबत दिवसातील अथवा आठवड्यामधील काहीवेळ, जसे जमेल तसे खर्ची घाला. यामुळे नवनवीन संकल्पना, अनुभव त्यांच्याकडून मिळू लागतात. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोनही समजू लागतो. 
✓ तुमच्या चांगल्या विचारांमध्ये आणि अनुभवात वाढ होऊ लागली, की समजून जा, तुमचे सकारात्मक विचार व आनंद उत्साह वाढू लागला आहे.
✓ काळानुरूप निसर्ग आणि वातावरणही बदलते. अगदी याचप्रमाणे आपणही बदलायला 
हवे, यामुळे सकारात्मक विचारांमध्ये वाढ होत राहते.

www.marathichamaster.com
www.marathichamaster.com

मित्रांनो,
       प्रत्येकाला जीवनात नेहमी आनंदी आणि उत्साही राहायचे असते. तसे तो प्रयत्नही करत असतो, परंतु योग्य ज्ञान पुरेसे नसल्याने, अनावश्यक नकारात्मक विचारांनी त्याच्या दिवसाची सुरुवात होते. संपूर्ण दिवस खराब आणि वाईट गोष्टींनी भरला जातो. परंतु या लेखामधील महत्त्वाची माहिती, तुम्हाला सदैव सकारात्मक ठेवण्यास नक्कीच मदत करेल. योग्य वेळी, योग्य विचार प्राप्त करण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात. मग दररोजच्या सकारात्मक विचारांसाठी नेहमीच तयारीत असायला हवे.
तुमच्या सर्वांच्या आनंदी, उत्साही, सकारात्मक विचारांच्या आयुष्याला सदैव यश लाभो, हीच सदिच्छा.
धन्यवाद....!! 

अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

तुमचे योगदान :-    

                  मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
 
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.

आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.

Post a Comment

0 Comments