Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

धंद्यामध्ये पैशाचे नियोजन असंच पाहिजे. This is how money planning in business should be.

धंद्यामध्ये पैशाचे नियोजन असंच पाहिजे. This is how money planning in business should be.

राम राम मंडळी,
       टीम मराठीचा मास्तर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो एका विशेष लेखामध्ये...
         धंदा, उद्योग, व्यवसाय नावे जरी वेगवेगळी असली तरी उद्देश मात्र एकच असतो, तो म्हणजे पैसा कमावणे. कितीही लहान असो अथवा मोठा असो, शेवटी तो धंदाच असतो. विक्री कौशल्य, व्यवसायिक मानसिकता आणि उत्कृष्ट अनुभवाच्या बळावर पैसा मिळवता येतो. धंदा करण्यासाठी, ना तुमची श्रीमंती पाहिली जाते, ना जात-धर्म.
धंद्यामध्ये पैशाचे नियोजन असंच पाहिजे.
धंद्यामध्ये पैशाचे नियोजन असंच पाहिजे.

       आपल्याकडे जे काही आहे, ते विकून फक्त पैसे कमवायचे. एवढा साधा सरळ अर्थ धंद्याचा असतो. चहाच्या टपरीपासून फळे, बांगड्या, भाजीपाला, शेती उपयोगी साहित्य, कपडे यासारख्या विविध वस्तूंची विक्री करून छोटा-मोठा चालवलेला धंदा अनेकांना लाखमोलाचा वाटतो. आणि त्यांच्या कुटुंबाची गुजराणही अशा छोट्या मोठ्या धंद्यावर अवलंबून असते. परंतु त्यामधील पैशाचे नियोजन, वस्तूची गुणवत्ता, विक्रीचे कौशल्य, तुमच्यातला आत्मविश्वास या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या वाटतात.
         या लेखामध्ये अगदी लहानात लहानापासून ते मोठ्यात मोठ्या उद्योग-धंद्यापर्यंतच्या व्यवसायासाठी, धंद्यासाठी पैशाचं नियोजन कसं करायचं या विषयीची माहिती दिलेली आहे.
        चला तर मित्रानो, वेळ न दवडता आपल्या धंद्याविषयी लागणाऱ्या पैशाच्या नियोजनाबाबतच्या लेखाला सुरुवात करुया.

(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master  यांचेकडेच राहतील.)

धंद्यामध्ये पैशाचे नियोजन असंच पाहिजे. This is how money planning in business should be.

* धंद्यासाठी पैशाची उभारणी आवश्यकच पण कर्ज नको. ( It is necessary to raise money for business but do not refuse loans.)

धंद्यासाठी पैशाची उभारणी आवश्यकच पण कर्ज नको.
धंद्यासाठी पैशाची उभारणी आवश्यकच पण कर्ज नको.

✓ सुरू केलेला धंदा ग्रामीण भागात असो अथवा शहरी भागात, त्याला तोपर्यंत मरण नसते, जोपर्यंत तुम्ही माघार घेत नाहीत. परंतु निव्वळ आत्मविश्वासाच्या बळावर धंदा चालत नाही, मग तो कितीही छोटा असो अथवा मोठा.
✓ कोणताही धंदा सुरू करण्यासाठी सर्वात मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे भांडवलाचा. प्रत्येकाच्या मनाला रुखरुख लावणारा हा प्रश्न असतो. यासाठी सर्वप्रथम धंदा चालू  करण्याअगोदरच त्यासाठीच्या पैशाचे नियोजन हे पक्क असावं लागतं.
✓ कोणताही छोटा उद्योगधंदा सुरु करण्याअगोदर पैसा उभा करणे गरजेचे असते. यासाठी अनेक लोक, नवतरुण बँका, पतसंस्था अथवा गावातील सावकाराकडून पैसे घेऊन धंदा सुरू करतात.
✓ अर्ज काढून अचानक आलेला पाचशे, हजाराचा पैसा तुम्हाला, तुमच्या धंद्यासाठी माफक वाटू लागतो. सुरुवातीचा काळ आपलाच आहे, या भोळ्याभाबड्या आशेवर धंद्याची सुरुवात होते. परंतु आलेल्या एखाद्या संकटाने धंदा कोलमडतोच.
✓ धंद्यासाठी पैशाच्या नियोजनामध्ये सर्वप्रथम 60:40 चा फॉर्मुला वापरणे गरजेचे असते. म्हणजे तुम्ही धंद्यासाठी जेवढे पैसे वापरू इच्छित असाल, प्रत्यक्षात यापैकी फक्त 60 टक्केच गुंतवणे नेहमी फायद्याचे असते.
✓ उरलेले 40% राहतात, ते धंद्याच्या सुरुवातीच्या काळातील अनभिज्ञ संकटासाठी आणि न सुटणाऱ्या प्रश्नांसाठीच्या राखून ठेवायचे असतात. यालाच पुस्तकी भाषेत पैशाचा बॅकअप प्लॅन असे म्हणतात.
✓ यामुळे तुमच्या धंद्याची सुरुवात तर होते, परंतु अनुभव नसल्याने विविध गोष्टी,बाबी आपल्याला मोठ्या वाटू लागतात. त्यावेळेस त्या सोडवण्यासाठी आपल्याकडे असणारा हा बॅकअप प्लॅन सदैव फायदेशीरच राहतो.

* उद्योगधंद्यामध्ये प्रत्येक टप्प्यानुसार पैशाची केलेली विभागणी महत्वाचे. (The division of money according to each stage of the business is important)

उद्योगधंद्यामध्ये प्रत्येक टप्प्यानुसार पैशाची केलेली विभागणी महत्वाचे.
उद्योगधंद्यामध्ये प्रत्येक टप्प्यानुसार पैशाची केलेली विभागणी महत्वाचे.

✓ धंद्यामध्ये सुरुवातीचा काळ मध्यावधीचा आणि यशाचा काळ असे टप्पे जरी पडत असले तरी तुमच्या पैशाच्या नियोजनाचे ही टप्पे असायला हवेत.
✓ सुरुवातीच्या काळातील पैशाच्या नियोजनानुसार 60 : 40 चा फॉर्म्युला हा सर्वोत्तमच मानला जातो. यामुळे धंद्याची सुरुवात कोणत्याही अनुभवाविना यशस्वीपणे सुरू करता येते.
✓ धंदा उभारून साधारणपणे सहा महिने ते दीड वर्षाचा कालावधी हा मध्यवधीचा काळ, नफा-तोट्यात चालत असतो. यावेळी आपणाला 50:50 चा फॉर्म्युला वापरणे गरजेचे असते.
✓ ज्यावेळेस धंदा तेजीत असेल, त्यावेळेस पैशाची गुंतवणूक वाढवून वस्तूचा पुरवठा आणि मागणी वाढवावी लागते. यामुळे तेजीच्या काळातील टप्प्यांमध्ये पैसा पुरेसा असावा लागतो. या उलट मंदीच्या काळात धंद्यातील वस्तूचा पुरवठा आणि मागणी कमी करून, गुणवत्तेवर भर द्यावा लागतो. यासाठी कमीत कमी पैसा वापरणे, आवश्‍यक राहते.
✓ धंद्यात येणारा पैसा आणि जाणारा पैसा यामध्ये वेळोवेळी बदल करायचे असेल तर त्याचा हिशोब, ताळेबंद ठेवायलाच हवा.

*  उद्योगधंद्यामध्ये परताव्याने आलेल्या पैशाचा ताळमेळ राखणे गरजेचे. (There is a need to balance the return money in the business)

उद्योगधंद्यामध्ये परताव्याने आलेल्या पैशाचा ताळमेळ राखणे गरजेचे.
उद्योगधंद्यामध्ये परताव्याने आलेल्या पैशाचा ताळमेळ राखणे गरजेचे.

✓ उद्योगधंद्यामध्ये आलेल्या प्रत्येक रुपयाला किंमत असते. त्याचा ताळमेळ ठेवणे, खूप महत्त्वाचे असते. व्यवसायाचे भविष्यातील साधक-बाधक परिणाम हे एक-एक रुपयावर अवलंबून असते.
✓ व्यवसायासाठी तुम्ही केलेली गुंतवणूक ही, तुम्हाला तुमच्या विक्री कौशल्याच्या बळावर वाढवायची असते. व्यवसायातून आलेला पैसा, कोणत्या दिवशी किती आला ? त्यासाठी आपण किती खर्च केला होता ? तो नफ्यात आहे की तोट्यात या गोष्ट समजण्यासाठी ताळमेळ ठेवणे गरजेचे असते.
✓ व्यवसाय, धंद्यामध्ये वस्तूच्या, सेवेच्या रूपात प्राप्त होणारा पैसा हा कधीच नफा नसतो. तुम्ही गुंतवलेले पैसे तुमच्या कष्टाच्या व्याजासहित ती परत आलेली रक्कम असते. परंतु तो पैसा, आपण नफा समजून इतरत्र खर्च करतो. त्यामुळे धंद्यासाठी पैशाची चणचण भासू लागते.
गुंतवलेला पैसा थोडा-थोडा प्राप्त होत असताना त्याचे नियोजन करणे गरजेचे असते. यामुळे व्यवसाय दिवसेंदिवस वाढत राहून योग्य दिशा मिळू लागते.
✓ प्रत्येक दिवसाला, महिन्याला आलेल्या पैशाचा ताळमेळ, नफ्यात आहे की तोट्यात हे समजायला वेळ लागत नाही. धंद्याची पुढील रणनीती यावरच तर अवलंबून असते.
✓ जागा, जाहिरात, नोकरवर्ग याव्यतिरिक्त विक्री करायच्या वस्तू मध्ये केलेली गुंतवणूक ही वेगवेगळी असते. त्यामुळे सुरुवातीला मिळणारे पैसे हे महत्त्वाचेच असतात, त्याचा ताळेबंद असणे गरजेचे आहे.

* धंद्यामध्ये पैशाचा हिशोब लिखीत ठेवा. (Keep track of the money in the business)

धंद्यामध्ये पैशाचा हिशोब लिखीत ठेवा.
धंद्यामध्ये पैशाचा हिशोब लिखीत ठेवा.

✓ निव्वळ एखादी वस्तू विकत आणून ते आपल्या विक्री कौशल्याच्या बळावर विकणे म्हणजे धंदा होत नसतो. तर त्यातून मिळालेला पैसा तुम्ही कशाप्रकारे पुन्हा धंद्यामध्ये वापरता, यावर तो धंदा ठरत असतो.
✓ धंद्यातील पैशाचा हिशोब ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामध्ये गुंतवलेली रक्कम तेवढीच प्राप्त होत असेल तर तुम्ही केलेले कष्ट हे वाया जात आहेत, असे समजावे. आणि गुंतवलेले पैसे तुमच्या कष्टाच्या मोबदल्यासहीत प्राप्त होत असेल तर तुमचा धंदा तेजीत आणि फायद्यात आहे, असे समजावे.
✓ किती आले आणि किती गेले, हे धंद्यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत सोपे नसते, यासाठी तुम्हाला प्रति दिवशी अथवा महिन्याला झालेली व्यवसाय उलाढाल मांडून ठेवणे गरजेचे आहे. यामुळे कोणत्या दिवशी विक्री जास्त झाली अथवा कोणत्या आठवड्यात धंद्याला मार बसला, यासारख्या विविध गोष्टी त्वरीत समजून येतात.
✓ महिन्याच्या महिन्याला धंद्यातील काढलेला ताळेबंद, हिशोब म्हणजे तुमच्या धंद्यासाठी भविष्यातील असणारी संजीवनी असते.
✓ धंद्यातील तेजी-मंदी, नफा-तोटा हा व्यवसायातील बदललेल्या वातावरणानुसार राहतो. तुम्ही लिहून ठेवल्याप्रमाणे हिशोब ठरत असतो. प्रत्येक गोष्टीची वेगळी किंमत असते, हे समजायला वेळ लागत नाही.
मित्रांनो,
         कोणताही धंदा लहान अथवा मोठा नसतो. तो एकाच सूत्रावर चालत असतो, तो म्हणजे एखाद्या सेवेच्या मोबदल्यात पैसा प्राप्त करणे होय. अशा धंद्यासाठी पैशाचे नियोजन नक्कीच महत्त्वाचे असते. त्यातून तुमची वेगळी ओळख जेवढ्या वेगाने होते, अगदी तेवढ्याच वेगात धंदा लयालाही जातो. याचे सर्वात मोठे कारण असते पैसा आणि त्याचे व्यवसायातील संबंध.
         या लेखात दिलेली महत्त्वाची माहिती तुमच्या उद्योगधंद्यासाठी सदैव फायदेशीरच राहील. 
         टीम मराठीचा मास्तर कडून तुमच्या सर्वांच्या यशस्वीपूर्ण उद्योगधंद्याच्या वाटचालीस खूप शुभेच्छा.
धन्यवाद....!!

अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

तुमचे योगदान :-    

                  मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
 
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.

आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.    

आम्हाला linkdin वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.   

Post a Comment

0 Comments