Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

स्वतःचा ब्रँड तयार करा. - ब्रँड है तो सब कुछ है. Create your own brand. - The brand is everything.

स्वतःचा ब्रँड तयार करा. - ब्रँड है तो सब कुछ है. Create your own brand. - The brand is everything.

राम राम मंडळी,
          स्वागत आहे सर्वांचं, एका विशेष नवीन माहितीपूर्ण अशा लेखामध्ये...
नवनवीन गोष्टींचा ज्ञान -भांडार असलेल्या प्रत्येक पोस्ट मधून आपणाला काही ना काही तरी संकल्पना, माहिती मिळत असतेच. या सर्व माहितीचा प्रत्येक वाचकाच्या जीवनात तिळमात्र जरी फायदा झाला, तरी खूप आहे.

स्वतःचा ब्रँड तयार करा. - ब्रँड है तो सब कुछ है.
स्वतःचा ब्रँड तयार करा. - ब्रँड है तो सब कुछ है.

             जीवन जगताना आपली ओळख आणि प्रसिद्धी ही सदैव वाढावी, यासाठी आपण आपण कष्ट करत असतो. प्रत्येकाला स्वतःची ओळख, ही जगाला दाखवून द्यायची असते. स्वतःचं नाव मोठं झालेलं पाहायचं असत. आपल आदर्श व्यक्तिमत्व लोकांना आवडाव, या दृष्टिकोनातून प्रत्येक सकाळ आपणाला जागृत करत असते. कधीतरी मनात प्रश्न डोकावतो की, कीड्यामुंग्यासारखे लोक जगतात आणि मरतातही. परंतु त्यांच्यासारखे न जगता स्वतःची काही विशेष ओळख असावी. आपल्या पश्चात किंवा अनुपस्थितीच्या काळात आपलेही नाव लोकांनी मोठ्या आदराने घ्यावे. यासाठीचा हा स्वयंपूर्ण लेख. 

Create your own brand. - The brand is everything.
Create your own brand. - The brand is everything.

          स्वतःची ओळख जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणीही किंमत देत नाही. त्यामुळे नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा कष्टाने मिळवलेली "इज्जत" जरा जास्तच भाव खाऊन जाते. या उक्तीप्रमाणे स्वतःचा ब्रँड तयार करा. जेणेकरून लोकांच्या या मोठ्या भाऊगर्दीत, तुमचीही उपस्थिती लाखमोलाची वाटली पाहिजे. 
           अशा स्वतःच्या ब्रँडसाठी, ओळखीसाठी कष्ट करावे लागतात. झिजावे लागते. परंतु कमी कालावधीत उत्तुंग यशस्वी व्यक्तिमत्व आणि ओळख कशी तयार करावी यासाठीची माहिती या लेखात पाहूया.

स्वतःचा ब्रँड तयार करा. - ब्रँड है तो सब कुछ है. Create your own brand. - The brand is everything.

* काम असे करा, की नाव तयार होईल.
* समाज तुमच्याकडे आदर्शवत नजरेने पाहत असतो.
* प्रत्येक वेळी स्वतःला अपडेट ठेवायला शिका.
* शिस्तीला सर्वात जवळचा मित्र बनवा.

(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master यांचेकडेच राहतील.)

* काम असे करा, की नाव तयार होईल. (Do the work so that the name will be created.)

काम असे करा, की नाव तयार होईल.
काम असे करा, की नाव तयार होईल. 

✓ जीवनात असलेले कोणतेही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रातील परिपूर्ण अथांग सागराचे असणारे सखोल ज्ञान मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा, आहे त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्टच असायला हवे, अशी इच्छा बाळगा.
तुमची ओळख ही तुमच्या कामामुळे होत असते. ज्या क्षेत्रातून किंवा कामातून तुम्हाला मिळणारे अर्थार्जन सर्वतोपरी असेल, त्या क्षेत्रात असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे असायलाच हवे. यामुळे हव्या त्या उंचीपर्यंत आपल्या क्षेत्राला अथवा कामाला नेता येते.
✓ तुमच्या कामाच्या ओळखीने समाजात मानाचे स्थान, तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही लोकांच्या उपयोगी पडाल. लोकांच्या समस्येला, तुमच्या कामातून सेवा देणे हा सर्वोत्तम उद्देश नेहमी ठेवा. यामुळे लोक तुम्हाला कायम स्मरणात ठेवतील.
तुमचे काम हीच तुमची ओळख असते. त्यामुळे प्रथम तुमच्या कष्टाने, कामाने नाव कमवा, कालांतराने आपोआप तुमच्या नावाने कामे होतील. हा ध्यास म्हणी बाळगा.
✓ एखाद्या क्षेत्रात घेतलेले रात्रंदिवसाचे कष्ट, हे त्या क्षेत्रातील मिळवलेल्या प्रत्येक गोष्टीच्या, बाबीच्या माहितीने, आपल्याला हवा तसा पैसा मिळवता येऊ लागतो. अशा वेळेस लोक, तुमचे काम पाहतात. कामातील शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर मिळवलेले यश, यामुळे तुमचे नाव तयार व्हायला वेळ लागत नाही.

* समाज तुमच्याकडे आदर्शवत नजरेने पाहत असतो. (Society looks at you with an idealistic eye.)

समाज तुमच्याकडे आदर्शवत नजरेने पाहत असतो.
समाज तुमच्याकडे आदर्शवत नजरेने पाहत असतो.

✓ तुम्ही, आहे त्या क्षेत्रातून अथवा कामातून समाजाच्या संबंधित असणाऱ्या समस्या सोडवू शकलात तर तुमचा ब्रँड तयार होऊ लागला आहे, असे समजावे.
✓ आपल्या कामातून मिळणाऱ्या अमाप पैशापेक्षा, कामातून देणाऱ्या सेवेच्या गुणवत्तेला " प्रथम प्राधान्य द्या". ज्यामुळे लोकांना तुमच्याविषयी आणि तुमच्या कामाविषयी आदराची भावना वाटू लागेल.
✓ तुमच्या कामातून तुम्ही, अनेक वाईट प्रसंगात लोकांना साथ द्या. मदत करा. समाज हा फार हुशार असतो. त्याला चांगल्या लोकांमधला फरक लगेच कळतो. त्यांना जवळच्या आणि परक्या माणसातील फरक जाणवतोच, त्यामुळे तुमचे सत्कार्य, तुमचे भावी भविष्य ठरवत असते.
तुमचे कष्ट हेच तुमचे दैवत आहे, हे सदैव स्मरणात ठेवा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी ही तुमच्या कष्टातूनच प्राप्त होत असते. एकदा का, ती लोकांना दिसली तर ते तुम्हाला डोक्यावर घेतात.
✓ समाजाने तुमच्याकडे ज्या आदर्शवत नजरेने पहायला पाहिजे, यासाठीचे जे स्वप्न तुम्ही पाहत आहात. त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही स्वतःकडेही त्याच नजरेने पहावयास हवे. जशी दृष्टी तशी सृष्टी.

* प्रत्येक वेळी स्वतःला अपडेट करत रहा.(Keep yourself updated every time.)
प्रत्येक वेळी स्वतःला अपडेट करत रहा.
प्रत्येक वेळी स्वतःला अपडेट करत रहा.

काळानुरूप बदल, ही जीवन जगण्याची एक महत्वाची रीत आहे. त्यामुळे प्रत्येक बदलाला अवश्य सामोरे जा. तुमच्यातील प्रत्येक टप्प्यातील होणारा बदल हा तुमच्या व्यक्तिमत्त्वाला रूपसाजेसा वाटू लागतो.
✓ तुम्ही केलेल्या शरीरातील, व्यक्तिमत्त्वातील अथवा विचारांतील बदलाला समाज त्वरीत स्वीकारतो. अशा बदलांमुळे तुमच्यात नवनवीन संकल्पना, चांगले विचार निर्माण होतात. ज्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षिले जाऊ लागतात.
✓ तुमची दिसणारी आकर्षक देहबोली आणि शब्दातून झळकणारे सकारात्मक विचार या गोष्टी लोकांना आवडू लागतात. ते तुमचे चाहते बनतात. यामुळे ओळख आणि प्रसिद्धी वेग धरू लागते.
✓ तुमचे उत्तम विचार, लोकासोबतच्या संवादात अथवा बोलण्यात ते प्रकट करा, यामुळे तुमचे व्यक्तिमत्व झळकू लागते. तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत येते. लोकांना, तुम्ही आपलेसे वाटू लागता.
✓ स्वतःच्या नजरेत स्वतःची आदर्शवत प्रतिमा कायम मनात ठेवा. जोपर्यंत तुम्ही स्वतःचे गुणगाण स्वतः करत नाहीत, तोपर्यंत समाजाकडून केलेली अपेक्षा निरर्थक ठरते. सकारात्मक विचारांची सुरुवात स्वतःपासून केल्याने त्याचे महत्त्व स्वतःसोबत इतरांना ही पटू लागते. अगदी याच प्रमाणे तुमची ओळख अथवा ब्रँड लोक मानू लागतील.

* शिस्तीला सर्वात जवळचा मित्र बनवा. (Make discipline your best friend.)

शिस्तीला सर्वात जवळचा मित्र बनवा.
शिस्तीला सर्वात जवळचा मित्र बनवा.

शिस्तीच्या बळावर विचारांची क्रांती घडवून आणता येते. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढू लागतो. आपली प्रत्येक कामे वेळेत पूर्ण होऊ लागतात. प्रत्येक गोष्टीतील सातत्य वाखाणण्याजोगे वाटू लागते.
✓ तुमच्या शिस्तीच्या बळावर, आहे त्या कामाला, कष्टाला हव्या त्या उंचीपर्यंत नेता येते. यामुळे लोक तुमच्या कष्टाला आणि यशाला सलाम करतात. तुमचे आदर्शवत उदाहरण मित्रपरिवारांत, नातेवाईकांमध्ये देतात.
आळस आणि निष्काळजीपणा, हे तुमच्या आदर्शवत उभरत्या व्यक्तिमत्वाला प्रत्येक वेळी खीळ घालत असतात. यांना त्वरित ओळखा. आपल्या प्रामाणिक कष्टाच्या बळावर स्वतःचा यशस्वी ब्रँड होतो, ही सकारात्मक भावना सदैव तुम्हाला प्रेरीत करत राहील.
✓ तुमच्यात असणाऱ्या शिस्तीमुळे चांगल्या सवयींची लवकर वाढ होते. त्यामुळे तुमचे विचार बदलत जातात आणि चांगल्या विचारांना समाजात नेहमीच मानाचे स्थान असते.
www.marathichamaster.com
www.marathichamaster.com

मित्रांनो,
       स्वतःचा ब्रँड तयार करण्यासाठीची लागलेली महत्त्वपूर्ण माहिती, या लेखात तुम्ही वाचली आहेच. परंतु ती माहिती अंगीकारून स्वतःचा ब्रॅण्ड बनवण्यापर्यंतचे कष्ट हे अजून बाकी आहेत. ज्याच्या बळावर लोकांमध्ये आदर्शवत ठरणारा स्वतःचा ब्रँड, तुम्ही उभा करू शकता.
टीम मराठीचा मास्तर कडून अशा सर्व भारावलेल्या प्रत्येक वाचकाच्या यशस्वी ब्रँड वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद....!!

आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल, फक्त पाच टिप्स - कोणतेही ध्येय पूर्ण कराल. Just five tips - you will accomplish each goal.)

अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

तुमचे योगदान :-    

                  मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
 
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.

आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.    

आम्हाला linkdin वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.   

Post a Comment

0 Comments