असे करा भविष्याचे परफेक्ट नियोजन. Do the perfect planning for the future.
राम राम मंडळी,
तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे, एका विशेष अश्या माहितीपूर्ण लेखामध्ये...
माणूस असा एकमेव प्राणी आहे, ज्याला आपल्या भविष्याविषयी सतत चिंता वाटत असते आणि त्याबाबत तो नेहमी आग्रही असतो. भविष्यासाठी तो पैशांची बचत करत असतो. वर्तमानातील बहुमूल्य असा वेळ उज्वल भविष्यासाठी खर्च करत असतो.
मित्रांनो, भविष्याबाबत सर्वजण विचार करतात परंतु त्याचे नियोजन फार कमी लोक करतात. मग तुम्ही असे काही नियोजन केले आहे का ? त्या भविष्याच्या नियोजनाप्रमाणे त्याची कार्यवाही सुरू केली आहे का ? भविष्याचे नियोजन केले असेल तर उत्तमच आणि नसेल केले तर हा लेख तुमच्यासाठी....
एखादे आवडीचे ध्येय जीवनात असल्यावर जीवन जगायला एक वेगळीच मज्जा येते. जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येतो. त्यामुळे आपलं भविष्य, उज्वल आणि योग्य दिशेने घडत असल्याचे समाधान मिळते.
मित्रांनो, या लेखामध्ये तुमच्या भविष्याचे नियोजन कशाप्रकारे उत्तम बनवता येईल याबाबतची बहुमूल्य अशी माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. चला तर मग ती माहिती समजून घेऊया....
असे करा भविष्याचे परफेक्ट नियोजन.(Do the perfect planning for the future.)
(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master यांचेकडेच राहतील.)
* तुमच्या आवडीचे कोणतेही एक ध्येये ठरवा आणि त्याचे पुढील 10 वर्षाचे नियोजन बनवा.(Set one of your goals and plan for the next 10 years.)
✓ प्रत्येकाला जीवनात कशाची ना कशाची, तरी आवड असतेच. असे आवड , छंद ज्यामुळे थोडेफार अर्थार्जन ही होईल असे ध्येय जरी मानले, तर जीवन आनंददायी होण्यास नक्कीच मदत होईल.
✓ असे कोणतेही एक ध्येय तुमच्या आवडीचे असणारे, ज्यासाठी तुम्ही वेळेचेही बंधन पाळत नाहीत, असे निवडा. ज्यामधून तुम्हाला भविष्यात कालांतराने चांगले अर्थार्जन ही होऊ शकेल.
✓ अशा आवडीच्या ध्येयाची निवड करा. जे पूर्ण करताना तुमचे सर्वसामान्य दैनंदिन जीवन आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठीचे जीवन हे समरस वाटू लागेल आणि चांगल्या प्रमाणात पैसाही मिळू लागेल.
✓ ज्यावेळेस एखाद्या धेयाची आपण निवड करतो. त्यावेळेस ते ध्येय आपल्या भावी आयुष्यासाठी नेहमीच लाभदायी राहील या उद्देशानेच ती निवड असते. म्हणून ठरवलेल्या ध्येयासाठी नेहमी ठाम राहायला शिका. अन्यथा काही महिन्यातच त्याचा कंटाळा येऊन तुम्ही ते सोडून द्याल.
✓ ध्येय ठरवत असताना आपल्या जीवनाला त्यामुळे कलाटणी मिळणार आहे, या उद्देशानेच ठरवा. ते ध्येय किती मोठे आहे अथवा किती छोटे आहे, हे कधीही पाहू नका. तसेच आपण, आपले ध्येय इतरांच्या ध्येयापेक्षा किती कमकुवत किंवा मजबूत आहे, हे दाखवण्याचा कदापिही प्रयत्न करू नका.
✓ यामध्ये जसे की, काहीना स्वतःचे हॉटेल उभारणे, गाड्या रिपेरिंग आणि सर्विसिंग याचा उद्योग सुरू करायचा असतो. तर काहींना शेअर मार्केट करून पैसा कमवायचा असतो. तसेच काहीना शेती, व्यवसायिक, उद्योजक होणे, स्वतःची कंपनी बनवणे यासारखे छोटे-मोठे ध्येय बाळगतात.
✓ आवडीच्या ठरवलेल्या ध्येयासाठी पुढील दहा वर्षाचे नियोजन करायला मात्र विसरू नका. ज्यामुळे पुढील दहा वर्षानंतर तुम्ही कोणत्या ठिकाणी असाल याचा आत्मविश्वास आतापासूनच तुमच्यात निर्माण होत असतो.
✓ भविष्य, उज्वल आणि सुख समृद्धीने पहावयाचे असेल तर कोणत्याही एका आवडीच्या ध्येयाने प्रेरित होऊन पुढील दहा वर्षाचे नियोजन नक्की करा. ज्यामुळे दहा वर्षानंतरची तुमची परिस्थिती, ही तुम्ही आज ठरवलेल्या ध्येयानुरूप अवश्य पूर्ण झालेली असेल.
* तुम्ही ठरवलेल्या ध्येयाचे अनेक टप्प्यांमध्ये विभागणी करा. (Divide your goal into several phases.)
✓ भविष्याचे परफेक्ट नियोजन करत असताना आवडीचा छंद, ध्येय तुम्हाला जीवन जगण्यासाठी नक्कीच प्रेरित करत राहील. असे कोणतेही ठरवलेले ध्येय काही एका दिवसात पूर्ण होत नाही. त्यासाठी काही कालावधी द्यावाच लागतो.
✓ जसे की, एखादी कंपनी उभी करायची अथवा हॉटेल, रेस्टॉरंट उभे करणे, वकील, डॉक्टर, उद्योजक बनायचे असेल तर त्यासाठीही काही निश्चित कालावधी असतोच. फक्त तो पूर्ण करण्याची धमक नेहमी ठेवा. त्यासाठी छोटे छोटे टप्पे पाडा. महिन्यांमध्ये, वर्षांमध्ये ते पूर्ण करण्यासाठीचे टप्पे असू द्या, त्यांची विभागणी करा.
✓ दहा वर्षाच्या ध्येयाला, पाच टप्प्यांमध्ये विभागले तर तुम्हाला ते ध्येय पूर्ण करणे सोपे वाटू लागेल. प्रत्येक दोन वर्षात तुम्हाला काय-काय करायचे आहे, याचा समग्र अभ्यास करणे सोपे होऊन जाईल.
✓ समजा, तुम्हाला एखादी स्वतःची मोठी कंपनी, पुढील दहा वर्षात उभारायची असेल तर यासाठी तुम्ही प्रति दोन वर्षाचे टप्पे असे पाच टप्पे करा. यामुळे कोणत्याही प्रकारचे दडपण न येता कंपनीसाठी लागणारी मानसिकता आणि कष्ट, हे सामान्य जीवन जगता-जगता सहज पूर्ण करू शकू.
✓ एखादा टप्पा पूर्ण केल्यावर जे आत्मिक समाधान मिळते, ते विलोभनीय असते. यामुळे तुमचा आत्मविश्वास दुप्पट होण्यास मदत होते. पुढील टप्पा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा निर्धार आणखी वाढू लागतो. ध्येयाच्या दिशेने पडणारे पाऊल सुखावह वाटू लागते.
✓ प्रत्येक टप्प्यावर एक नवा अनुभव तुम्हाला शिकण्यास मिळतो आणि तोच जीवनातील सर्वात मोठा गुरु असतो. त्यामुळे अशक्य वाटणारे आजचे स्वप्न, ध्येय कालांतराने तुम्हाला शक्य वाटू लागते.
✓ भविष्याच्या परफेक्ट योजनांमधील छोट्या छोट्या टप्प्यांचा, ध्येयाच्या दिशेने घेतलेला आराखडा तुमचा ध्येयाचा प्रवास सुखमय करतो.
* आपल्या ध्येयासाठी दररोज काही वेळ द्या, नंतर तो वेळ प्रतिदिन वाढवा. (Give yourself some time each day for your goal then increase that time every day.)
✓ जिथे आवड असते, तिथे आपोआप सवड मिळतेच. या उक्तीप्रमाणे तुमच्या भविष्याच्या परफेक्ट नियोजनासाठी निवडलेल्या ध्येयासाठी वेळ मिळतोच मिळतो.
✓ आवडलेल्या ध्येयासाठी दहा वर्षाचा नियोजन आराखडा बनवून झाल्यावर जे छोटे छोटे टप्पे पाडत असतो, परंतु हेच ते छोटे-छोटे टप्पे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनातील काही वेळ हा द्यावाच लागतो. कदाचित सुरुवातीला हा वेळ कमी असू शकतो परंतु कालांतराने हळूहळू तो वाढवावा लागतो.
✓ जसे तुम्ही ध्येयासाठी छोटे-छोटे टप्पे पाडले. अगदी त्याचप्रमाणे यासाठी लागणाऱ्या अनेक महत्त्वाच्या कामांसाठीच्या वेळेचेही छोटे छोटे टप्पे पाडा. कोणत्या वेळी, कोणती कामे पूर्ण करायची ? त्याचे बारीक नियोजन करा.
✓ इतर सर्वसामान्य जीवनाप्रमाणेच तुम्ही तुमच्या ध्येयासाठी दिलेला वेळ कमी जरी असला तरी " थेंबे थेंबे तळे साचे " या म्हणीप्रमाणे एक दिवस मोठ्या तळ्याचे स्वरूप ध्येयाला प्राप्त झालेले असेल.
✓ दररोज काही तासांचा कालावधी जरी दिला तरी महिन्यात, वर्षात तुम्ही खूप मोठा कालावधी देत असतात. यामुळे कालांतराने त्याची आवड निर्माण होऊन ती सवय बनून जाते.
✓ आपल्या छोट्या मोठ्या ध्येयासाठी तुम्ही काढलेला वेळात वेळ हा बहुमूल्य असतो. या निर्णयासाठी तुमची शिस्त आणि सातत्य नेहमीच वाढत राहते. यांच्या बळावरच लोकांना अशक्य वाटणारे ध्येय तुमच्यासाठी सहज आणि सोपे वाटू लागते.
* ध्येयासाठी आत्मविश्वास वाढवत राहा, संशयी वृत्तीला थारा देऊ नका. (Keep building up confidence for the goal, don’t give in to skepticism.)
✓ एखाद्या धेय्यासाठी आपण प्रेरित होऊन कामाला सुरुवात करतो. अशा परिस्थितीत अनेक वेळा आपल्या मनात धेय्याबाबत साशंकता निर्माण होऊ लागते. ठरवलेले ध्येय पूर्ण होईल की नाही ? हे जर कष्ट वाया गेले तर ? चुकीच्या दिशेने तर नाहीना चाललो ? यासारखे असंख्य प्रश्न मनात डोकावू लागतात. परंतु ठरवलेले आणि लिहिलेले ध्येय पूर्ण करणारच. हा महत्त्वाचा उद्देश विसरता कामा नये, ज्यावर तुमचे उज्वल भविष्य अवलंबून असते.
✓ ज्यावेळेस आवडीच्या ध्येयासाठी आपण सतत कार्यमग्न राहतो. त्यावेळेस धेय्य सोडण्याबाबतचे असले फालतू विचार चुकूनही मनातही येत नाहीत. आत्मविश्वासपूर्वक ते ध्येय पूर्ण करण्याचे समाधान भविष्यात मिळणार आहे. या आनंदानेच प्रत्येक दिवस धेय्यासाठी समर्पित करत असतो.
✓ ठरवलेल्या ध्येयासाठी आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असते, त्यासाठी यासंबंधी असणारी नवनवीन पुस्तके, किंवा त्या क्षेत्रातील यश मिळवलेल्या व्यक्तींचे मनोगत अथवा भेटीगाठी, तुम्हाला वेळोवेळी प्रेरित करत राहतील.
✓ नेहमीच ठरवलेल्या ध्येयाबाबत ठाम राहा. ज्यामुळे लोक तुम्हाला ध्येयासाठी वेडा झालेला माणूस म्हणूनही ओळखू लागतील.
✓ तुम्ही घेतलेले कष्टाचे फळ हे पुढील दहा वर्षांनी, तुम्ही आज ठरवलेल्या नियोजनापेक्षाही जास्त प्रमाणात मिळेल. हा अनेक यशस्वी व्यक्तींचा खराखुरा अनुभव आहे.
मित्रांनो,
आपल्या जीवनाच्या नावेला उज्वल भविष्याच्या किनाऱ्यावर पोचवण्यासाठी परफेक्ट ध्येयाची वल्ही वापरावी लागते. अशा या ध्येयाने प्रेरित झालेल्या व्यक्तीला त्याच्या उज्ज्वल भविष्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नकारात्मक विचारांनी भरलेल्या जणसमुदायातून वायुवेगाने तो सर सर पुढे जात असतो. तुमच्या भविष्याची दोरी ही तुमच्याच हातात असते. लेखात दिलेल्या माहितीन्वये तुम्ही तुमच्या भविष्याचे परफेक्ट नियोजन बनवणारच.... अशी आम्हाला ठाम आशा आहे. सर्वांच्या उज्वल वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद....!!
(आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल.जगप्रसिद्ध रिच डॅड पुअर डॅड पुस्तकातील पैशाबाबतच्या महत्त्वाच्या टिप्स. Important tips about money from the world famous Rich Dad Poor Dad book.)
अभिप्राय :-
सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
तुमचे योगदान :-
मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.
आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.
आम्हाला linkdin वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.







0 Comments
Thanks, for your comments.