कमीत कमी वयामध्ये करोडपती होण्यासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्स. Tips and tricks to become a millionaire at a young age.
राम राम मंडळी,
तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे, एका नवीन आणि आकर्षक अशा पैश्याच्या बाबत असणाऱ्या लेखामध्ये...
आजकाल लोकं माणसापेक्षा पैशाला जास्त किंमत देतात. त्यामुळे माणसातली माणुसकी कुठेतरी हरवत चालली आहे. लहानपणाची दोस्ती असणारे अनेक मित्र आजकाल बदललेल्या परिस्थितीत पैशाच्या मागे धावताना मैत्री विसरताना दिसत आहेत.
जीवनात प्रत्येक गोष्टीची किंमत असते त्यामुळे कदाचित पैशाला एवढे मोठे महत्त्व प्राप्त झाले ही असेल. म्हणूनच की काय, आजच्या धावत्या युगात पैसा पुढे आणि माणूस त्याच्या मागे पळतो आहे.
समाजात अशी ही काही लोक आहेत. ज्यांनी खूप सारा पैसा, अगदी कमी कालावधीत यशस्वीपणे कमावला आहे. अशा लोकांकडे काहीतरी विशिष्ट माहिती असेलच की, ज्यामुळेच आज ते करोडपती बनलेले आहेत.
मित्रांनो, या लेखामध्ये अगदी कमीत कमी वयात जास्तीत जास्त पैसा कसा कमवाल किंवा करोडपती कसे होता येईल याविषयीची असणारी महत्वपूर्ण माहिती देण्याचा छोटासा प्रयत्न आहे.
चला तर मित्रांनो, कोणतीही वेळ न दवडता करोडपतीच्या आयुष्याला लागणारी माहिती पाहुयात.
कमीत कमी वयामध्ये करोडपती होण्यासाठीच्या टिप्स आणि ट्रिक्स. Tips and tricks to become a millionaire at a young age.
(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master यांचेकडेच राहतील.)
* आजपासूनच सुरुवात करा, टु डू लिस्ट बनवाच. (Start today, make a to-do list.)
✓ मित्रांनो, असे म्हटले जाते की, तुमची एक कृती ही हजार शब्दांच्या बरोबरीचे असते. त्यामुळे तुमच्या मोठ्यात मोठ्या स्वप्नांना करोडपती होण्यासाठी तुम्हाला आज आत्तापासूनच सुरुवात करावी लागेल कारण तुम्हाला वेळेचे बंधन आहे.
✓ करोडपती होणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. यासाठी तुम्हाला अमाप कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी तुमचा वेळ देणे तेवढेही क्रमप्राप्त राहील. त्यामुळे नोकरीतून हे स्वप्न पूर्ण करणे, सोडूनच द्या. यासाठी तुम्हाला व्यवसायच करावा लागेल.
✓ समाजामध्ये वावरणारे करोडपती हे जरी कधी काळी नोकरी करत असले तरीही शेवटपर्यंत नोकरीतूनच ते करोडपती झाले आहेत, असे आपणाला पहावयास मिळत नाहीत. म्हणजेच करोडपती होण्यासाठी तुम्हाला स्वतःचे साम्राज्य उभे करणे गरजेचे आहे, ज्यावर संपूर्ण नियंत्रण फक्त तुमचेच असेल.
✓ जेवढा मोठा पैसा दिसतो आहे, त्यासाठी कष्ट आणि वेळ ही तेवढीच मोठी द्यावी लागेल. वेळेचे नियोजन करणे आवश्यक राहील अन्यथा गाढवागत काम करूनही करोडपती होता येणार नाही.
✓ प्रत्येक मोठी गोष्ट प्राप्त करत असताना त्या गोष्टीचे छोटे-छोटे पाडलेले टप्पे सहजरित्या आपण पूर्ण करू शकतो. अगदी याच नियमाप्रमाणे करोडपती होण्यासाठी तुम्हाला आजची कोणती कामे आहेत ? इथपासून सुरुवात करावी लागेल. यासाठी तुम्हाला टुडू लिस्ट खूपच फायदेशीर ठरेल.
✓ टुडू लिस्ट म्हणजे आजच्या कामाची असलेली यादी होय. जी तुम्हाला आज दिवसभरात पूर्ण करायच्या असलेल्या कामांची वारंवार जाणीव करून देत असते. अनेक जण या छोट्याशा टू डू लिस्ट कडे दुर्लक्ष करतात. परंतु टुडू लिस्टमुळेच तुमच्या अंगातील शिस्त नावाचा गुण वाढीस लागत असतो.
✓ टुडू लिस्ट मुळे प्राप्त होणारी शिस्त आणि कामातील सातत्य यामुळे एक चांगल्या प्रकारची सवय लागून जाते. त्यामुळे जेवढी मोठी शिस्त असेल तेवढे मोठे यश संपादन करणे सोपे होऊन जाते. अशक्यप्राय वाटणारे करोडपती बनण्याचे स्वप्न ही तुम्हाला या शिस्तीच्या बळावर अगदी किरकोळ वाटू लागते.
✓ करोडपती होण्यासाठी आजपासून केलेल्या सुरुवातीला, तुम्ही नियोजनामुळे योग्य प्रकारे न्याय देऊ शकता. यामुळे तुम्ही जर वेळेला योग्य किंमत दिली तर प्रत्येक वेळ, क्षण तुम्हालाही त्याच पद्धतीची किंमत देईल.
* उत्पन्नाचे स्रोत वाढवा, खर्च कमी करा. (Increase sources of income, reduce costs.)
✓ कोणत्याही एकाच उत्पन्नाच्या आधारावर करोडपती होणे म्हणजे मूर्खपणाचे पहिले लक्षण होईल. कारण व्यवसाय असो अथवा नोकरी यामधून मिळणारी इन्कम ही माफक प्रमाणात असते. परंतु अनेक व्यवसायमधून मिळणारी इन्कम ही तुम्हाला करोडपती होण्याच्या मार्गावर वेगाने धावणाऱ्या इंजिन गाडीच्या डिझेल प्रमाणे काम करते.
✓ विविध उत्पन्नाचे स्रोत म्हणजे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी आपले पदार्पण आणि त्यातून मिळणारा वेगवेगळा प्राप्त होणारा पैसा होय. यामध्ये तुम्ही शहराच्या ठिकाणी स्वतःचे घर, जागा, प्लॉट, दागदागिने, शेअर मार्केट यामध्ये स्थावर-जंगम गुंतवणूक, याप्रमाणे भविष्यातील वाढीव मिळकतीसाठीची गुंतवणूक करू शकता. तसेच शेअर मार्केट विविध प्रकारचे दुकाने, हॉटेल्स, मॉल्स, रेस्टॉरंट, यातून चांगल्या प्रकारचा प्रतिदिन येणारा उत्पन्न स्रोत मिळवू शकता.
✓ करोडपती होण्यासाठी तुम्हाला एकाच उत्पन्नाच्या मार्गावर अवलंबून न राहता अनेक उत्पन्नाचे मार्ग तयार करावे लागतील. यासाठी तुम्ही विविध मार्गांचा वापर करू शकता. जसे की शेती, दागदागिने, हॉटेल्स, यामध्ये ही गुंतवणूक करू शकता, ज्यामध्ये भविष्यात नेहमी किंमत वाढत राहील. अशाच पद्धतीच्या अनेक मार्गांमध्ये गुंतवणूक केल्याने पैसाही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्राप्त होईल.
✓ तसेच दररोजच्या होणाऱ्या फालतू गोष्टींवरचा ही खर्च कमी करायला शिका. यामधून तुमच्या पैशाला गळती न लागता, एक प्रकारे तो थोपवला जाऊ शकतो. या फालतू गोष्टींमधून भविष्यात इन्कमपेक्षा, आहे तीच केलेली गुंतवणूक ही प्राप्त होत नसेल तर अशा फालतू गोष्टी टाळलेलेच बरे..
✓ करोडपती होण्यासाठी तुम्हाला टप्प्याटप्प्याने तुमची गुंतवणूक वाढवत न्यावी लागेल आणि खर्चही कमी करावा लागेल. यासाठी तुम्ही वर्षाला काही लाखांचे टारगेट ठेवा. त्यानंतर प्रतिवर्षी ते वाढवत न्या. यामुळे कमीत कमी वेळेत आपले ध्येय, लक्ष करोडपती होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत राहील.
* पैशाची आणि वेळेची सांगड घालायला शिका. (Learn to combine money and time.)
✓ करोडपती होण्यासाठी किती महिन्यात, किती पैसे कमवायचे अथवा किती वर्षात, किती पैसा मिळवायचा याबाबतचे विस्तृत विवेचन असणारे नियोजन करणे ज्याला जमते, तोच करोडपती होऊ शकतो.
✓ जर तुम्हाला एखादा मोठा केक खाण्यास दिला तर तुम्ही तो छोट्या छोट्या भागात कापून पूर्णपणे फस्त करू शकता. परंतु संपूर्णच्या संपूर्ण केकचा भाग खाणे तुम्हाला कदापिही शक्य नाही. अगदी याचप्रमाणे करोडपती होण्यासाठी त्याचे टप्पे पाडून किती महिन्यात किती पैसे कमवायचे आहेत आणि ते कमावताना कोणत्याही दडपणाविना कसे कमवू शकतो ? हे नियोजन करायला जमले तर नक्कीच त्या दिशेचे पाऊल फार मोठे असेल.
✓ करोडपती होण्याच्या पाठीमागे लागलेले असताना रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारीही ठेवावी लागते. संकटे, अडचणी आलेल्या, प्रत्येक समस्येवर उत्तर शोधण्याची तयारी ठेवावी लागते. त्यामुळे या कमीत कमी वेळेत घेतलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कष्टाची वेळ वाढवावी लागेल आणि आरामाची वेळ कमी करावी लागेल.
✓ ज्याप्रमाणे घरातील कर्त्या व्यक्तीवर कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी असते. या जाणिवेपोटी तो रात्रंदिवस खपत असतो, कष्ट करत असतो. अगदी त्याचप्रमाणे करोडपती होण्यासाठी असणारी भूमिका आणि त्याबाबतची कष्ट करण्याच्या जबाबदारीची जाणीव ही असू द्यावी लागते.
* बचत आणि गुंतवणूक या दोन्ही वेगवेगळ्या बाबी आहेत, हे समजून घ्या.(Understand that savings and investing are two different things.)
✓ करोडपती होणे म्हणजे शंभर लाख रुपये कमावणे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणातील पैसा कमवायचे असेल तर त्याचे नियोजन ही आलतूफालतू असून चालत नाही, तर तेवढेच तगडे असावे लागते.
✓ ज्या वेळेस तुम्ही अनेक क्षेत्रातून कमावलेला पैसा कोणत्याही फालतू गोष्टीवर खर्च न करता साठविला जातो. तर त्याला बचत म्हणतात. परंतु निव्वळ बचत करूनही करोडपतीचे असणारे स्वप्न साकारता येत नाही. पैसा नुसताच साठविला तर तो कुजतो, त्यापेक्षा त्याला योग्य ठिकाणी भविष्यात आणखी वाढ कशी होईल, अशा प्रकारे खर्च कराव लागतात, गुंतवावे लागतात.
✓ तुम्ही केलेल्या अमाप कष्टातून, विविध उत्पन्नाच्या स्रोतांच्या मार्गाद्वारे आलेला बक्कळ पैसा बचतीच्या स्वरूपात साठवला असता, तो भविष्यात आणखी कसा वाढत राहील, या दृष्टीने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खर्च करणे म्हणजेच तुम्ही त्यासाठी केलेली गुंतवणूक असते आणि ही गुंतवणूक तुमच्या भावी करोडपतीच्या वाटचालीसाठी फार मोठा यशाचा टप्पा असतो.
✓ ज्या वेळेस मोठ्या प्रमाणातील येणारा पैसा कायमचा असतो. त्यावेळेस तुमचे वार्षिक बचत आणि वार्षिक गुंतवणूक असा टर्न ओव्हर साकारू लागतो यामुळे तुमचे विचारही तेवढेच उच्च दर्जाचे होतात.
✓ करोडपती होण्यासाठी लागणारा एवढा मोठा पैसा मिळवण्यासाठी तुमचे विचारही तेवढेच मोठे आणि गुणवत्तापूर्ण होईलच कारण वाहत्या पाण्याला नेहमी मार्ग सापडतोच.
मित्रांनो,
करोडपती होणे जेवढे अवघड वाटते, तेवढेच ते सोपेही आहे. परंतु तुम्ही केलेल्या विचारांवर आणि कष्टाच्या बळावर ' अशक्य ते शक्य' असा वाटणारा प्रवास सुलभ होऊन जातो. ज्याप्रमाणे नदीचे पाणी वाहत असते, त्यावेळेस त्याला अनेक मार्ग दिसतात. परंतु जर का ते एखाद्या डबक्यात साचून राहिले तर ते पाणी खराब होते, त्याचे मार्ग बंद होतात. अगदी याच प्रमाणे नेहमी वाहत्या पाण्यासारखे सदैव नवनवीन संकल्पना अमलात आणत राहा. चुकीमधून शिकत रहा. अनुभवांची गाठोडी वाढवत राहा.
यशाची शिखरे आपोआप सर होत राहतील. एक दिवस करोडपतीचा मुकुटमणी तुमच्या शिरस्थानी दिसू लागेल.
धन्यवाद.....!!
(आमचा हा ही लेख तुम्हाला वाचायला आवडेल, 21 ते 35 च्या तारुण्यात असे सक्सेसफुल व्हायचे - महत्त्वाच्या टिप्स. To be successful at the age of 21 to 35 - important tips.)
अभिप्राय :-
सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.
तुमचे योगदान :-
मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.
आम्हाला फेसबूक वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.
आम्हाला linkdin वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.







0 Comments
Thanks, for your comments.