Ticker

6/recent/ticker-posts

Advertisement

Responsive Advertisement

वेळेची संपत्ती ज्याच्याकडे, तो सर्वात मोठा. The one who has the wealth of time, the greatest.

 वेळेची संपत्ती ज्याच्याकडे, तो सर्वात मोठा. The one who has the wealth of time, the greatest.

राम राम मंडळी,
        टीम मराठीचा मास्तर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो, वेळेसंबंधी असणाऱ्या लेखामध्ये...
         जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीला जसे महत्त्व असते. प्रत्येक गोष्टीची जशी किंमत असते, अगदी त्याच प्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात वेळेचे महत्व, वेळेची किंमत तेवढीच असते. प्रत्येकाला ती ओळखता येते, असे काही एक नाही.
 
वेळेची संपत्ती ज्याच्याकडे, तो सर्वात मोठा.
वेळेची संपत्ती ज्याच्याकडे, तो सर्वात मोठा. 

अनेकांना ती लवकर समजते तर कित्येकांना पूर्ण जीवनभर तिचे महत्त्वही कळत नाही. लहानपणापासून आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेळेचे महत्त्व समजावून सांगितले जाते, परंतु प्रत्येकालाच ते म्हणजे योग्य वाटतेच वाटते, असे नाही.
         असे म्हणतात की, पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येतात. परंतु वेळ एक मात्र अशी गोष्ट आहे, जी पैशाने अथवा कोणत्याही मौल्यवान वस्तूने ही विकत घेता येऊ शकत नाही. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा प्राप्त करता येत नाही. यासाठी वेळीच वेळेचे महत्त्व जाणायला शिका. ज्या वेळेस तुम्ही वेळेची कदर करू लागता, त्याचवेळेस वेळ तुमची कदर नक्कीच करेल. 

The one who has the wealth of time, the greatest.
The one who has the wealth of time, the greatest.

          मानवी जीवनात प्रत्येक टप्प्यावर वेळेचे महत्त्व, विशिष्ट वयाप्रमाणे वाढत जाते. परंतु सर्वात महत्त्वाचा वेळ हा तारुण्याचा काळ म्हणून ओळखला जातो. अगदी कमी कालावधीसाठी लाभलेला हा तारुण्याचा काळ, यामधील वेळ ही सर्वात मौल्यवान गोष्ट असते. याच तारुण्याच्या वेळेचा सदुपयोग केल्याने पुढील आयुष्याची वेळ ही अगदी आनंदात घालवता येते.
चला तर मित्रांनो, पाहूया वेळेचे महत्त्व, वेळेचे किंमत याविषयीची माहिती...

वेळेची संपत्ती ज्याच्याकडे, तो सर्वात मोठा. The one who has the wealth of time, the greatest.

(टीप :- सदरील लेखात वापरण्यात आलेली माहिती ही विविध माध्यमे, पुस्तके, नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके, तसेच सोशल मीडिया स्रोत च्या माध्यमांद्वारे प्राप्त केलेली आहे, तसेच या लेखाचे सर्वाधिकार टीम मराठीचा Master  यांचेकडेच राहतील.)

* तारुण्यातील वेळेचे महत्व.(The importance of time in youth.)

तारुण्यातील वेळेचे महत्व.
तारुण्यातील वेळेचे महत्व.

✓ प्रत्येकाच्या जीवनामध्ये सर्वाधिक मौल्यवान काळ असतो, तो म्हणजे त्याचा तरुणपणाचा काळ. अशा या तारूण्याच्या काळातील वेळ, ही सर्वात मौल्यवान गोष्ट असते. ज्याला त्याची किंमत कळते, तो आपल्या आयुष्याला हवा तसा आकार देऊ शकतो.
✓ तुम्ही तुमच्या जीवनाचा वेळ कशा प्रकारे आणि कोणत्या ठिकाणी गुंतवता यावर तुमच्या जीवनात तुम्ही किती यशस्वी होणार आहात, हे दिसून येते. 
✓ ऐन तारुण्याच्या काळात अनेक मुले-मुली, तरुण वर्ग यांना वेळेचे महत्त्व अजिबात वाटत नाहीत. अमूल्य असा वेळ ते फालतू गप्पा-टप्पा मारण्यात, टाईमपास करण्यात, एकमेकांच्या टवाळक्या करण्यातच घालवतात. परंतु अशा अमूल्य वेळेला ऐन तारुण्यात नाकारले तर ती वेळही अशा मुलांचे आयुष्य भविष्यात नाकारते.
✓ ज्या तरुणाला, तारुण्यातील वेळेचा सदुपयोग करता आला, त्याला यशाची परिसीमा नक्कीच गाठता येते. कमीत कमी वेळेमध्ये, जास्तीत जास्त काम करण्याचे कौशल्य यासारखे गुणधर्म शिकता येतात. या गोष्टीसाठी ही वेळ द्यावाच लागतो.
✓ तारुण्यातील वेळेला महत्त्व दिले तर भविष्यातील वेळ सुरक्षित करता येते. कोणतीही संकटे ही काही सांगून येत नाहीत. त्यामुळे वेळेचा सदुपयोग करून अनेक अनुभव गाठीशी घालून आयुष्याला हवी तशी कलाटणी देता येते.

* वेळ आणि पैशाचे संबंध.(The relationship between time and money.)

वेळ आणि पैशाचे संबंध
वेळ आणि पैशाचे संबंध

✓ प्रत्येक जण आपल्या दिवसभराच्या अनेक कामांसाठी आपला वेळ देत असतात. जसे की, काही जण नोकरी करतात तर काही जण व्यवसाय, धंदा करत असतात. अशा ठिकाणी त्यांनी दिलेल्या वेळेच्या मोबदल्यात त्यांना पैसा मिळत असतो.
✓ यामुळे प्रत्येकाच्या जीवनात वेळेचे आणि पैशाचे घनिष्ठ संबंध पहावयास मिळतात. अनेकांना त्यांच्या वेळेनुसार पैसा प्राप्त होतो. अनेक मोठमोठे वक्ते, उद्योजक, व्यवसायिक हे नेहमी आपल्या पैशाला वेळेतच मोजत असतात.
✓ ज्याने त्याने आपापल्या जीवनामध्ये वेळेचा मोबदला आणि त्याचे महत्त्व निश्चित केले पाहिजे. तुम्हाला तुमच्या वेळेचा मोबदला हा पैशाच्या स्वरूपात मिळवायचा असेल तर तुम्हाला वेळेला तेवढेच महत्त्व द्यावे लागेल. वेळेसाठी झटावे लागेल. आपल्या कृतीतून क्षणक्षण जपावे लागतील.
प्रत्येकाची किंमत, त्याच्या आयुष्यातही त्याच्या वेळेवरच ठरत असते. बघा ना ऐन तारुण्यात फालतू गोष्टींना दिलेला वेळ, त्या मुलाचे संपूर्ण जीवन बरबाद करते तर ऐन वृद्धपणाच्या आयुष्यात एखादा जोपासलेला छंद आणि त्यासाठी दिलेला वेळ यामुळे त्या वृद्ध व्यक्तीचे संपूर्ण जीवन उजळून निघते.
✓ जीवनातील ऐन तारुण्याचा वेळ हा तुम्हाला संपूर्ण जीवन सावरण्यासाठी अमाप पैसे मिळवण्यासाठी मिळालेला असतो.
✓ ज्याला आपल्या जीवनामध्ये वेळेचे आणि पैशाचे संबंध व्यवस्थितरित्या नियोजनपूर्वक जोडता आले. त्याला जीवनाचे आणि वेळेचे महत्त्व नक्की समजलेले असते. असा व्यक्ती जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर अनेक संधींना वेळीच ओळखतो आणि त्यांचे रुपांतर एका यशस्वी निर्णयामध्ये परिवर्तित करत असतो.
✓ मित्रांनो वेळ अमूल्य आहे, तिची किंमत ती निघून गेल्यावरच कळते.

* वेळेला वेळीच ओळखायला शिका.( Learn to recognize from time to time.)

वेळेला वेळीच ओळखायला शिका
वेळेला वेळीच ओळखायला शिका

✓ लक्षात ठेवा, जीवनामध्ये एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही, तसेच जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही पैशाच्या बळावर अथवा स्वतःच्या हिमतीवर नक्कीच प्राप्त करू शकता. परंतु वेळ एक मात्र अशी गोष्ट आहे की, तिला या पृथ्वीतलावर कोणीच पुन्हा प्राप्त करू शकत नाही.
✓ पैशाने सर्व गोष्टी विकत घेता येतात. परंतु वेळ विकत घेता येत नाही. त्यामुळे लहानपणीचा वेळ, तारुण्यातील वेळ आणि म्हातारपणाचा वेळ यांना, त्यावेळीच आनंदाने जगायला शिका. त्यांचे महत्त्व जाणा.
✓ ज्याला भरपूर पैसा कमवायचा आहे, अशा व्यक्तीने जसा पैशाचा, संपत्तीचा, मित्रांचा, शिक्षणाचा हिशोब ठेवलेला असतो. अगदी त्याच प्रमाणे वेळेचाही हिशोब ठेवायला हवा.
✓ बरेच लोकं वेळेबाबत अनभिज्ञ असतात. स्वतःची वेळ कुठे आणि कशी निघून जाते, याबाबत त्यांना काही एक कळत नाही. वेळ निघून गेल्यानंतर उरतो तो फक्त पश्चाताप. अशा स्थितीत ते निघून गेलेल्या वेळेला दोष देत बसतात.
✓ भविष्यासाठी प्रत्येक जण सर्व गोष्टींचे वर्तमानात नियोजन करतो. परंतु भविष्यातील वेळेचे नियोजन करणे, अजून पर्यंत कोणाला जमलेही नाही आणि जमणारही नाही.
✓ ज्या वेळेस तुम्ही, स्वतःच्या जीवनामध्ये वेळेला किंमत द्याल. अगदी त्याच क्षणापासून तुमच्यामध्ये शिस्त तयार होते. ह्याच शिस्तीच्या बळावर खूप सारा पैसा आणि यश वेळेसोबत प्राप्त करता येते.

* आवडीच्या क्षेत्रातील वेळेला जपा.(Save time in your area of interest.)

आवडीच्या क्षेत्रातील वेळेला जपा.
आवडीच्या क्षेत्रातील वेळेला जपा.

✓ आजच्या धावपळीच्या युगात अनेक महत्त्वाच्या गोष्टी माणूस सहजपणे विसरत चालला आहे. त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःची आवड. ज्यामधून त्याला स्वर्गीय सुख प्राप्त होणारा आनंद मिळत असतो. अशीही स्वतःची आवड जोपासण्यासाठी सुद्धा वेळ ही महत्त्वाची असते.
✓ प्रत्येकाला जीवनात काही ना काही तरी आवड असतेच. अशा आवडीसाठी तुमच्या जीवनातील, तुम्ही कोणतीही वेळ द्यायला तयार होता. परंतु जर ती सार्थकी लागत असेल तर त्यासाठी वेळ निघतोच.
✓ आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी दिलेला वेळ यातून मिळणारा आनंद हा खूप मोठा असतो. ज्यामुळे आपले जीवन सुकर होण्यास नक्कीच मदत होते. जीवनातील पोकळी भरून काढण्याचे काम आपली आवड करत असते.
अनेकांचे आवड, छंद हे त्यांचे व्यवसाय बनू लागतात. यामधूनही त्यांना चांगले पैसे मिळू लागतात. अर्थार्जन होऊ लागते. परंतु या सर्वांसाठी लागते ती बहुमूल्य वेळ.
✓ अनेक लोकं आपल्या आवडीसाठी जीवनातील बहुमूल्य वेळ काढत असतात. दिवसाचे बारा बारा तास ते या आवडीसाठी, छंदासाठी देतात. यामुळेच त्यांची आवड आणि छंद यातून मिळणारा वेळेचा परतावा हा नेहमीच सुखावह असतो.

www.marathichamaster.com
www.marathichamaster.com

मित्रांनो
          प्रत्येकाच्या जीवनात वेळेचे महत्त्व खूप आहे आणि हे प्रत्येकाला समजलेच, अशी एखादी तरी वेळ येतेच. त्यामुळे वेळेचे महत्त्व वेळीच जाणा. आपल्या जीवनातील बहुमूल्य अशी वेळ चांगल्या कामासाठी, यशस्वी जीवनासाठी सदैव वापरा. यामुळे एक यशस्वी व्यक्ती जरूर होता येईल.
         जीवनातील अनेक संपत्तीपैकी एक महत्त्वाची संपत्ती जी कशानेही पुन्हा मिळवता येत नाही, ती म्हणजे तुमचा बहुमूल्य असलेला वेळ...
धन्यवाद....!! 

अभिप्राय :- 

               सदरील लेखात दिलेली माहिती आपणाला आवडली असेलच....या लेखातील माहितीने तुमच्या विचारांना नक्कीच नवी पालवी फुटलेली असेल, जीवनाबाबतची नवीन विचारधारा रुजू लागली असेलच. अशी ही महत्त्वपूर्ण असणारी माहिती, इमेजेस, आपल्या नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना, मित्रपरिवारात, व्हाट्सअप, ट्वीटर आणि फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करायला विसरू नका.

तुमचे योगदान :-    

                  मित्रांनो, तुमच्याही मनात, मोबाईल मध्ये या लेखा संबंधित आणखी काही माहिती असेलच. जी सर्वांना माहित व्हावी अथवा कळवावी, असे वाटत असेल तर जरूर तुम्ही ती कमेंट मध्ये टाईप करून आम्हाला शेअर करू शकता. भविष्यकाळात ती माहिती या लेखात समाविष्ट करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
 
टीम मराठीचा Master यांना खालील सोशल मिडियावर Follow करू शकता.

आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.

आम्हाला ट्विटर वर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक करा.

Post a Comment

0 Comments